एक हात मदतीचा.....! छत्रपती प्रतिष्ठान व एसआरजी ग्रुपकडून मोफत भाजीपाला - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

एक हात मदतीचा.....! छत्रपती प्रतिष्ठान व एसआरजी ग्रुपकडून मोफत भाजीपाला

उंबरे : प्रतिनिधी        सध्याच्या कोरोना या विषाणूपासून दक्षता म्हणून सरकारच्या आदेशानंतर कोणीही घराच्या बाहेर पडत नाही, त्यामुळे...

उंबरे : प्रतिनिधी   




  1.    सध्याच्या कोरोना या विषाणूपासून दक्षता म्हणून सरकारच्या आदेशानंतर कोणीही घराच्या बाहेर पडत नाही, त्यामुळे  भाजीपाला खरेदीसही अडचणी जाणवत आहेत, अशावेळी एक सामाजिक बांधिलकी म्हणून छत्रपती प्रतिष्ठान व एसआरजी ग्रुपचे कार्यकर्ते मदतीसाठी धावून आले आहे. यातच छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने अनेक कुटुंबाना मोफत भाजीपाला देऊन सहकार्य केले जात असल्याची माहिती कार्याध्यक्ष प्रा. जालिंदर दुशिंग यांनी दिली.     छत्रपती प्रतिष्ठान नेहमीच सामाजिक कार्यात पुढे असते. आबालवृद्धांसाठीच्या विविध निराधार योजनेचे शिबीर, आरोग्य शिबिरे, गोरगरिबी मुलांना कपडे वाटप, वृक्षारोपण, एसटी कार्ड शिबीर, तसेच दरवर्षी छत्रपती पुरस्कार वितरण सोहळे घेऊन सामाजिक बांधिलकी जपत असते. सध्याच्या कोरोनाचा पार्श्वभूमीवरही छत्रपती प्रतिष्ठान आणि एस आर जी ग्रुप या दोन्ही संघटनांनी एकत्र येऊन भाजीपाला वाटप करण्याचा निर्णय घेतला त्यानुसार काल विशिष्ट्य भागात चार-चार तरुणांचा ग्रुप बनविण्यात आला होता. त्यात कैलास अडसुरे, , गणेश अलावणे, अक्षय साबळे, दत्ता पवार तसेच, अल्ताफ शेख, गांगुर्डे, बबलू ढोकणे, भैया ढोकणे, अक्षय ढोकणे, तसेच लक्ष्मण पटारे, गणेश भवार, भारत दरंदले तसेच दीपक ढोकणे, सचिन दुशिंग, सचिन शेजुळ,  आदीं कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन टोमॅटो, फ्लॉवर व अन्य अल्पसा भाजीपाला मोफत देऊन  या संकट समयी खारीचा वाटा उचलला आहे. ही मदत भरीव नसली तरी यातून काही अंशी निश्चितच अनेकांना मदत होणार आहे.                                                     दरम्यान, कोरोना पार्श्वभूमीवर ज्या ज्या सामाजिक संघटनांना जनतेला मदत करणे शक्य आहे, ती त्यांनी करावी असे सरकारने आवाहन केल्यानंतर उंबरे येथील छत्रपती प्रतिष्ठानने एसआरजी ग्रुपच्या तरुणांच्या मदतीने मोफत भाजीपाला वाटपाचे हे काम केले आहे, आम्हाला कुणी चांगले म्हणावे यासाठी हे काम केलेले नाही, मात्र ज्यावेळी इतिहासात हा कोरोनाचा प्रसंग लिहिला जाईल, त्यात उंबरे या छोट्याशा गावात आपण केलेले हे कार्य निश्चितच मनाला सदैव सतकार्याची आठवण करून देणारे ठरेल, असे  दैनिक पुढारीचे उपसंपादक गोरक्षनाथ शेजुळ यांनी संगितले,

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत