काळजी घ्या अन घरातच थांबा....! जनतेला कोणी कोणी केले आवाहन, वाचा खाली - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

काळजी घ्या अन घरातच थांबा....! जनतेला कोणी कोणी केले आवाहन, वाचा खाली

उंबरे : प्रतिनिधी     सध्या कोरोना या विषाणूने थैमान घातले आहे. त्यामुळे प्रत्येकाने घरातच थांबून आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, ...

उंबरे : प्रतिनिधी   
 सध्या कोरोना या विषाणूने थैमान घातले आहे. त्यामुळे प्रत्येकाने घरातच थांबून आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन युवानेते कैलास अडसुरे, हभप आदिनाथ महाराज दुशिंग, आदर्श गाव विकास मंचचे मार्गदर्शक ज्ञानदेव क्षीरसागर, ग्लोबल स्कुलचे अध्यक्ष डॉ, रामकिसन ढोकणे, कावेरी कॅटल फिडसचे संजयजी अडसुरे, सोसायटी मा.चेअरमन विलासराव ढोकणे, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष बाबासाहेब गोरे, पत्रकार जालिंदर ढोकणे, छत्रपती प्रतिष्ठान अध्यक्ष लक्ष्मण पटारे, कासार समाज प्रांत सदस्त राजेंद्र उंडे, विश्व हिंदू परिषदेचे सुरेश उंडे आदीनी केले आहे .  देशावर व आपल्या राज्यावर मोठे संकट आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपले मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची टीम या संकटाचा सामना करत आहे. त्यासाठी उपाय योजना करत आहेत. सरकारने गांभीर्य ओळखुन सर्वाना घरात थांबण्याची सूचना केली आहे. तसेच डॉक्टर, पोलीस, तहसील कर्मचारी देखील आपली काळजी घेण्यासाठी प्रयत्न करत आहे. म्हणून आपणही आपली काळजी घ्यावी, घराबाहेर पडू नये, सूचनांची अमलबजावणी करावी, कोरोन्टइन शिक्का असलेल्यानी दक्षता घ्यावी, एकाच ठिकाणी गर्दी करू नये, येणारे 48 तास आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे, त्यामुळे आपण स्वतः कसे सुरक्षित राहू व आपल्यापासून इतर लोकही कसे सुरक्षित राहतील, यासाठी दक्ष असले पाहिजे, गावात आप्पासाहेब ढोकणे हे वेळोवेळी शासकीय सुचना करत आहेत, त्याचे आपण सर्वांनी पालन केले पाहिजे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते कडूभाई पठाण, डॉ. मगर डॉ. राहुल जोर्वेकर, युवानेते दीपक ढोकणे, शिक्षण प्रेमी सुनील डेंगळे, रेवनाथ ढगे, प्रगतशील शेतकरी विलासराव गरुड, दत्तात्रय एकनाथ ढोकणे, विष्णू कडू, बाळू येवले, एसआररजी ग्रुपपचे गणेश अलावणे, पैलवान आकाश साबळे, राजू फोटो स्टुडिओचे चेअरमन राजु  नानेकर, किराणा असोसिएशनचे अनिल लक्ष्मणराव ढोकणे, गणेश मित्र मंडळाचे गोरक्षनाथ ढोकणे, सेतूमित्र गणेशराव ढोकणे, गणेश दुशिंग, दत्त मंडपचे संचालक संतोष ढोकणे, अक्षय जरे, दत्ता पवार, भैया ढोकणे, बबलू ढोकणे,  सामाजिक कार्यकर्ते गणेश दरंदले, भारत दरंदले, राजू फोटोजचे अध्ययक्षनेकर, किरण ढोकणे, युवा आयडॉल गणेश भवार, भारत भवार, संदीप काळे,  प्रवीण गायकवाड, सुनील वैरागर,  सचिन शेजुळ आदींनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत