उंबरे : प्रतिनिधी सध्याच्या कोरोना विषाणूच्या संरक्षणासाठी प्रशासनाने विविध उपाय योजना केल्या आहेत, त्याचाच एक भाग म्हणून उंबरे येथे...
उंबरे : प्रतिनिधी
सध्याच्या कोरोना विषाणूच्या संरक्षणासाठी प्रशासनाने विविध उपाय योजना केल्या आहेत, त्याचाच एक भाग म्हणून उंबरे येथेही रेशन वाटप करताना लाभार्थ्यांमध्ये सोशल डिस्टन्स ठेवण्यासाठी विशिष्ट रचना करण्यात आली आहे, या रचनेनुसार नागरिक शांततेत धान्याचा लाभ घेताना दिसत आहे. दरम्यान छत्रपती प्रतिष्ठानने सोसायटीने केलेल्या नियोजनाबद्दल धन्यवाद दिले आहेत. उंबरे सोसायटीच्या रेशन दुकानात मार्च महिन्याचा कोठा वाटण्यासाठी वितरक सचिन वैरागर, भारत ढोकणे आणि कैलास अडसुरे यांनी चांगल्या प्रकारे नियोजन केले आहे, कोरोनापासून दक्षता म्हणून प्रत्येक नागरिकांसाठी पांढऱ्या फक्कीचा वापर करून विशिष्ठ अंतरावर चौकट तयार करण्यात आल्या आहेत, अगोदर सर्वांची रेशन कार्ड जमा केली जात आहेत, त्यानुसार कैलास अडसुरे हे रेशन कुपन धारकाचे नाव पुकारत आहेत, त्यानंतर सचिन वैरागर हे कुपन नोंदवतात तर भारत ढोकणे हे धान्य वाटप करत आहेत, अशा पद्धतीने उंबरे गावात शांततेत व सर्वाना धान्य देण्यासाठी ही यंत्रणा काम करत आहेत. दरम्यान, सध्या मार्च महिन्याचे धान्य वाटप होत असून ज्यांचे धान्य नेणे बाकी आहे, त्यांनी धान्य घेऊन जावे, असे आवाहन कैलास अडसुरे, सचिन वैरागर आणि भारत ढोकणे यांनी केले आहे. दरम्यान छत्रपती प्रतिष्ठानने सोसायटीने केलेल्या नियोजनाबद्दल धन्यवाद दिले आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत