उंबरे : प्रतिनिधी सध्या कोरोनामुळे सर्व व्यवहार ठप्प आहेत, त्यामुळे आपल्या गावची अर्थव्यवस्था कोलमडली आहे, येणाऱ्या काळात ती पुन्हा भर...
उंबरे : प्रतिनिधी
सध्या कोरोनामुळे सर्व व्यवहार ठप्प आहेत, त्यामुळे आपल्या गावची अर्थव्यवस्था कोलमडली आहे, येणाऱ्या काळात ती पुन्हा भरूनही निघेल, मात्र त्यासाठी जनतेने संयम ठेवण्याची गरज असून कोणीही कामाशिवाय घराबाहेर न पडता प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन राष्ट्रवादीचे युवानेते दिपकराव ढोकणे यांनी केले आहे. ढोकणे म्हणाले की, आज आपल्या उंबरे गावावर कोरोनाचे संकट आहे,सर्व उद्योग व्यवसाय बंद आहेत, त्यामुळे सर्व अडचणीत आहेत,गावातील ग्रामसेवक, तलाठी अधिकारी गावात लोकांना दक्षता घेण्याचे आवाहन करत आहेत, मात्र अजूनही अनेकजण विनाकारण घराबाहेर पडत आहेत, आपण सर्वांनी महिना घरात काढला, त्यामुळे गावात कोरोना येऊ शकला नाही, हा आपल्या सर्वांच्या विजय आहे, आता फकत काही दिवस आपल्याला काळजी घ्यायची आहे, कुणीही 3 मे पर्यंत बाहेर पडू नये, आरोग्य जपावे, सर्दी, ताप, खोकला अंगावर काढू नये तत्काळ डॉक्टरांकडे जाऊन आपली, आपल्या कुटुंबाची आणि सम्पूर्ण गावाची काळजी घ्यावी, असेही ढोकणे म्हणाले आहेत, तसेच गावात अडचणीच्या काळात जनतेला मदत करणाऱ्या मंत्री तनपुरे साहेब कर्डीले साहेब, छत्रपती प्रतिष्ठान तसेच सर्व डॉक्टर , मेडिकलचालक, दूध संकलन चालक, पशुखाद्य वाले, कृषी केंद्र चालक, किराणा दुकानदार यांचेही ढोकणे यांनी आभार मानले

कोणत्याही टिप्पण्या नाहीत