वटवाघूळमधून कुत्र्याद्वारे कोरोना संसर्ग ; कॅनडात संशोधन वाचा खाली - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

वटवाघूळमधून कुत्र्याद्वारे कोरोना संसर्ग ; कॅनडात संशोधन वाचा खाली

दिल्ली वेबटीम: सामना वृत्त कोरोना विषाणूंचे उगमस्थान जरी वटवाघुळांमध्ये असले तरी त्याचा प्रसार हा वटवाघुळांमधून कुत्र्यांना झाला आणि कु...

दिल्ली वेबटीम: सामना वृत्त
कोरोना विषाणूंचे उगमस्थान जरी वटवाघुळांमध्ये असले तरी त्याचा प्रसार हा वटवाघुळांमधून कुत्र्यांना झाला आणि कुत्र्यांपासून त्या विषाणूने मानवाच्या शरीरात प्रवेश केला असे एका संशोधनात उघड झाले आहे.
कॅनडाच्या ओटावा विद्यापीठातील बायोलॉजीचे प्राध्यापक जुहूआ जिया यांनी संशोधनाअंती हा निष्कर्ष काढला. त्यांचा संशोधन निबंध ‘मॉलिक्युलर बायोलॉजी ऍन्ड इव्होल्यूशन’ या नियतकालिकामध्ये मंगळवारीच प्रसिध्द झाला.
कोरोना विषाणू म्हणजेच कोविड-19 ज्याला ‘सार्स-कोविड 2’ असेही म्हटले जाते. कोविड-19 च्या पूर्वीही अन्य दोन प्रकारच्या कोरोना विषाणूंनी मानवी शरीरात शिरकाव केला होता. ते होते ‘सार्स-कोविड’ आणि ‘मर्स-कोविड’. त्या विषाणूंची उत्पत्तीही वटवाघुळांमध्येच झाली होती आणि नंतर अन्य प्राण्यांमार्फत त्यांची लागण माणसांना झाली होती.
मुंग्या खाणाऱया पेंगोलिनवरही संशय 
गेल्या फेब्रुवारी महिन्यात अमेरिकेमध्ये एक संशोधन झाले. त्यात असे दिसून आले की कोविड-19 विषाणू हा वटवाघुळांमधून मुंग्या खाणाऱया पेंगोलिन या प्राण्यामध्ये आला आणि नंतर पेंगोलिनमार्फत माणसामध्ये घुसला. परंतु अनेक संशोधकांचे त्या निष्कर्षाबद्दल दुमत होते.
सार्स लांडग्यांमार्फत तर मर्स विषाणूची उंटांमार्फत माणसाला लागण 
सार्स-कोविड विषाणूची लागण वटवाघुळांपासून लांडग्यांना झाली होती आणि लांडग्यांपासून त्याचा प्रसार माणसांमध्ये झाला होता. मर्स-कोविड विषाणूही वटवाघुळांमधूनच व्हाया उंटांमार्फत माणसांमध्ये शिरला होता. मानव ज्या प्राण्यांच्या संपर्कात राहतो त्याच प्राण्यांद्वारे कोरोना हा मानवापर्यंत पोहोचतो.
हिंदुस्थानी संशोधकांना वटवाघुळांमध्ये सापडला कोरोना 
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) संशोधकांनाही वटवाघुळांमध्ये कोरोना विषाणू सापडला. कोरोना विषाणूचे उगमस्थान वटवाघुळामध्ये असल्याचे पहिले संशोधन चीनमध्ये झाले होते. आयसीएमआरनेही त्या दिशेने संशोधन केले. वटवाघुळांच्या दोन जातींमध्ये कोरोना आढळल्याची माहिती आयसीएमआरचे डॉ. रमण गंगाखेडकर यांनी दिली.
सोळाव्या वयात शाळेला रामराम करणाऱया मुलीने शोधला कोरोना 
कोरोना विषाणूचा शोध प्रथम 1964 मध्ये लागला. वयाच्या सोळाव्या वर्षी शाळेला रामराम करणार्या ज्यून अल्मेडा या मुलीने कोरोनाचा शोध लावला होता. शाळा सोडल्यानंतर इंग्लंडच्या ग्लासगो येतील प्रयोगशाळेत त्यांनी टेव्नैशियनची नोकरी केली होती. लंडनच्या थॉमस रुग्णालयातील प्रयोगशाळेत त्यांनी कोरोनाचा शोध लावला. ऍन्डीबॉडीजच्या सहाय्याने विषाणूला अधिक चांगल्या रितीने कसे पहायचे त्याचे तंत्र अल्मेडा यांनी विकसित केले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत