पंतप्रधान मोदींची उद्या मोठी घोषणा ! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

पंतप्रधान मोदींची उद्या मोठी घोषणा !

नवी दिल्ली : लोकमत वृत्त देशात कोरोना व्हायरसला थोपविण्यासाठी मोदी सरकारने २४ मार्चला २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली होती. उद्या या...

नवी दिल्ली : लोकमत वृत्त
देशात कोरोना व्हायरसला थोपविण्यासाठी मोदी सरकारने २४ मार्चला २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली होती. उद्या याचा शेवटचा दिवस आहे. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी १० वाजता देशाला संबोधित करणार आहेत. याची माहिती त्यांनी ट्विट करून दिली आहे.

गेल्या २१ दिवसांच्या काळात मोदींनी दोन वेळा देशाला संबोधित केले आहे. यावेळी त्यांनी पहिल्यांदा कोरोनाशी लढणाऱ्या डॉक्टर, नर्स आरोग्य सेवकांचे मनोबल उंचावण्यासाठी थाळी वाजविण्याचे आवाहन केले होते. मात्र, यावेळी मोठ्या प्रमाणावर लोक रस्त्यावर आले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत