उंबरे : प्रतिनिधी कोरोना विषाणूच्या संकटात आज उंबरेकर एकदिलाने लढत असताना त्यांना जिल्हा परिषद सदस्य, आजी-माजी आमदार मदत पाठवत आहेत,...
उंबरे : प्रतिनिधी
कोरोना विषाणूच्या संकटात आज उंबरेकर एकदिलाने लढत असताना त्यांना जिल्हा परिषद सदस्य, आजी-माजी आमदार मदत पाठवत आहेत, आशा प्रकारे ग्रामपंचायतीनेही आपल्या गावातील प्रत्येक कुटुंबाला 500 रुपयांचा किराणा किट वाटप करून जनतेने दिलेल्या मतांच्या उपकारातून उतराई व्हावे, अशी अपेक्षा युवानेते राहुल पाटील यांनी केली आहे. राहुल पाटील म्हणाले, निवडणुका आल्यानंतर मतांसाठी जनतेच्या दारात जातात, तुमचा कळवळा दाखवतात, एक संधी द्या, मी तुम्हाला विसरणार नाही, अशी खोटी शपथही घेतात, मात्र निवडणूक संपल्या की सगळं काही विसरून जातात, आशा भोळ्या भाबड्या ग्रामस्थांना फसवणे आता थांबले पाहिजे, आज गावावर संकट आहे, गावात 1200 ते 1400 कुटुंब आहेत, या कुटुंबाना मदतीची गरज आहे, याच कुटुंबाकडे काही लोकांनी मतांसाठी पाच वर्षांपूर्वी हात जोडले होते, मग आता लोक संकटात सापडल्याने त्यांना मदत करण्याची यांची नैतिक जबाबदारी नाही का ?, एकीकडे जेष्ठ नेते सुभाष पाटील यांनी भाजीपाला पाठवला, माजी आमदार शिवाजी कर्डीले यांनी किराणा वाटप केले, मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी किराणा, धान्य वाटले, ही सर्व लोक जनतेच्या उपकारला जागली, त्यांनी मतदार संकटात असताना त्यांना मदत पाठवली, अशीच मदत ग्रामपंचायततिनेही करावी, 14 वा वित्त आयोगात भरपूर निधी आहे, तो जनतेचाच आहे, आता जनतेसाठी तो खर्च करावा, याकामी एकही सदस्य आडवा येणार नाही, त्यामुळे सर्व सदस्यांनी याबाबत चार भिंतीच्या आत निर्णय घ्यावा, जनता तुमच्या पाठीशी खम्बीरपणे उभी आहे, मात्र या संकटात तुम्ही जर तुम्हाला मतं दिलेल्या जनतेचा विश्वासघात कराल, तर जनता पुन्हा तुम्हाला दारात उभी करणार नाही, असा इशारा ढोकणे यांनी दिला

कोणत्याही टिप्पण्या नाहीत