दिल्ली : वेबटीम जगबुडी होणार, जगाचा अंत होणार याच्याशी संबंधित अनेक चर्चा होत असतात. दक्षिण अमेरिकन देशांमध्ये वापरण्यात येणाऱ्या माया स...
दिल्ली : वेबटीम
जगबुडी होणार, जगाचा अंत होणार याच्याशी संबंधित अनेक चर्चा होत असतात. दक्षिण अमेरिकन देशांमध्ये वापरण्यात येणाऱ्या माया संस्कृतीच्या कॅलेंडरला घेऊन मागील अनेक वर्षापासून जगभरात सुरू असलेल्या दाव्यांमध्ये आणखी एका दाव्याची भर पडली आहे. करोनाच्या संसर्गामुळे जगभरात भीतीचे वातावरण असताना आता २१ जून रोजी जगाचा अंत होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. माया संस्कृतीच्या कालगणनेनुसार जगाचा अंत जवळ आला असल्याचा दावा करण्यात येत आहे. याआधी याच कालगणनेत करण्यात आलेले दावे चुकीच्या गृहीतकावर आधारलेले होते. त्यामुळेच भविष्यवाणी चुकीली असल्याचा दावा करण्यात आला आहे. जगाचा अंत होणार असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर सोशल मीडियावर अफवांना ऊत आला आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत