युवराज आदित्यला तिने केले विश ..! चर्चा तर होणारच ना ... - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

युवराज आदित्यला तिने केले विश ..! चर्चा तर होणारच ना ...

मुंबई : वेबटीम  अनेक दिवसांपासून चर्चेत असलेले आदित्य आणि अभिनेत्री दिशा पटानी यांची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.  पर्यावरण मंत्री आदित्...

मुंबई : वेबटीम 
अनेक दिवसांपासून चर्चेत असलेले आदित्य आणि अभिनेत्री दिशा पटानी यांची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.  पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबत काही महिन्यांपूर्वी दिशा 'डिनर डेट'ला गेली होती. त्यानंतर दोघांना अनेकदा एकत्र पाहिलं गेलं होतं. विशेष म्हणजे  आदित्य ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. या निमित्तानं दिशानं त्यांना ट्विटरवर शुभेच्छा दिल्यात.
दिशानं आदित्य ठाकरेंना शुभेच्छा देताना 'वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा,असाच चमकत रहा' असं म्हणत 'हार्ट'चा इमोजी देखील पोस्ट केला आहे. त्यामुळं पुन्हा एकदा दिशाच्या या ट्विटची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात आदित्य यांना दिशासोबतच्या नात्यावर प्रश्न विचारला असता त्यांनी भन्नाट उत्तर दिलं होतं.
 आदित्य ठाकरेंसोबत दिशाची 'डिनर डेट', ट्रोलर्सनं केलं हैराण
काही महिन्यांपूर्वी संगमनेरच्या अमृतवहिनी महाविद्यालयात 'संवाद तरुणाईशी' या कार्यक्रमात राज्यातील सहा तरुण आमदारांनी संवाद साधला. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री अदिती तटकरे, रोहित पवार, धीरज देशमुख, ऋतुराज पाटील, झिशान सिद्दीकी या आमदारांची मुलाखत गायक, संगीतकार अवधूत गुप्ते यांनी घेतली. यावेळी गुप्ते यांनी युवा आमदारांना वैयक्तिक प्रश्न विचारून धमाल उडवून दिली होती.'आई मुलाची जबाबदारी तो मोठा होईपर्यंत घेते, नंतर ती जबाबदारी दुसऱ्या कुणाकडं तरी देते. रश्मी वहिनींनी किती वर्षे तुमची जबाबदारी घ्यायची असा प्रश्न आदित्य ठाकरेंना अवधूत गुप्तेंनी विचारला असता उपस्थितांनी एकच जल्लोष केला होता. या प्रश्नावर आदित्य ठाकरे म्हणाले होते की, 'आता आमदार म्हणून माझी जबाबदारी आईनं मुख्यमंत्र्यांकडं सोपवली आहे. त्यावर अवधूत गुप्तेंनी पुन्हा विचारलं, आम्हाला मध्ये मध्ये बातम्या येत असतात, आप कुछ भी बोलो, हमे आपकी बात ‘पटनी’ चाहिए.  यावर आदित्य ठाकरे यांनी तुमची ‘दिशा’ चुकलेली आहे, असं म्हटलं होतं.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत