श्रीरामपूर, राहुरीसह जिल्ह्याला पावसाने झोडपले; रस्ते पाण्याखाली, पिकांचेही नुकसान, - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

श्रीरामपूर, राहुरीसह जिल्ह्याला पावसाने झोडपले; रस्ते पाण्याखाली, पिकांचेही नुकसान,

श्रीरामपूर : वेबटीम श्रीरामपूरसह उत्तरेतील कोपरगाव, राहुरी, संगमनेर, अकोले व अन्य तालुक्यात काल दमदार पाऊस झाला, त्यात राहुरी शहरात पाणीच ...

श्रीरामपूर : वेबटीम श्रीरामपूरसह उत्तरेतील कोपरगाव, राहुरी, संगमनेर, अकोले व अन्य तालुक्यात काल दमदार पाऊस झाला, त्यात राहुरी शहरात पाणीच पाणी झाले होते तर उंबरे गावातील रस्तेही पाण्यात बुडाल्याचे पहायला मिळाले. यंदा मान्सून तारखेपूर्वीच जिल्ह्यात दाखल झाला आहे. काल दुपार पासून पावसाची चाहूल लागली होती, त्यामुळे बळीराजा शेतीच्या कामात लगबग करताना दिसून आला, दरम्यान, दुपारी 4 नंतर पावसाने सुरुवात केली, पाहता पाहता वरुणराजा धो धो बरसला, श्रीरामपूर शहरात सुमारे 2 तास पाऊस सुरू होता, तर राहुरीच्या मुसळधार पर्जन्य वृष्टीW झालेली पहायला मिळाले, शहरात शनिचौक पाण्याखाली गेला होता, याशिवाय अन्य रस्तेही पाण्याने ओव्हर फ्लो झालेले दिसून आले, तालुक्यातील बारागाव नांदूर, विद्यापीठ, वांबोरी, ब्राम्हणी, अरडगाव, देवळाली परिसरात चांगला पाऊस झाला, उंबरे गावातही पावसाने चांगलेच झोडपून काढले, संगमनेरात सर्वदूर पाऊस झाला, पठार भागात या पावसाने दिलासा मिळाला, तर अकोलेतही दमदार पाऊस झाला, एकूणच कालचा पाऊस चांगला झाला असला तरी ज्या शेतकऱ्यांच्या पेरण्या बाकी आहेत, त्या आणखी लांबणार आहेत, शिवाय काही भागात मोठा पाऊस झाल्याने तेथील लागवडी झालेल्या कपाशीला फटका बसणार आहे, काही शेतकऱ्यांचे कांदे भिजल्याने त्यांचे नुकसान होणार असल्याचे दिसंत आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत