श्रीरामपूर : वेबटीम । 175 वर्षांपुर्वीची सद्गुरू गंगागिरी महाराज पालखीची परंपरा आहे महाराज झोपडीला काडी लावून एकाग्रतेने आषाढी वारीला ज...
श्रीरामपूर : वेबटीम।

175 वर्षांपुर्वीची सद्गुरू गंगागिरी महाराज पालखीची परंपरा आहे महाराज झोपडीला काडी लावून एकाग्रतेने आषाढी वारीला जात. शासनाच्या नियमाचे पालन करणे आपले कर्तव्य आहे.परंतू खंत एवढीच वाटते शासनाने सर्व व्यवहार सुरळीतपणे सुरू करून दारू दुकानांना परवानगी,लग्नासाठी 50 लोकांना परवानगी दिली, मग आषाढी पायी पालखीस मोजक्या वारकर्यांना परवानगी का? असा सवाल महंत रामगिरी महाराज यांनी केला आहे.
सदगुरू गंगागिरी पंढरपुरच्या पांडुरंगाच्या आषाढी एकादशीला पायी पालखी सोहळयाने प्रत्यक्ष शरीराने दर्शनाला जाऊ शकत नसलो तरी अंतःकरणात तळमळ असल्याने ध्यानचिंतनातही प्रत्यक्ष पांडुरंगाच्या दर्शनाचा लाभ मिळतो.असा उपदेश महंत रामगिरी महाराज यांनी श्रीक्षेत्र सराला बेट ते पंढरपूर पारंपरिक पद्धतीने सद्गुरू गंगागिरी महाराज पायी पालखी सोहळ्याचे प्रस्थान प्रसंगी केला.
आज सोमवार दि.15 जून ज्येष्ठ वद्य दशमीला पारंपरिक पध्दतीने श्रीक्षेत्र सराला बेट येथून सद्गुरू गंगागिरी महाराज पायी पालखी सोहळ्याचे कोविड - 19 सोशल डिस्टशनचे नियम पाळत पंढरपुरच्या मार्गावर प्रस्थान करण्यात आले.सदगुरू गंगागिरी महाराज.सदगुरू नारायणगिरी महाराज समाधी मंदिरास प्रदक्षिना घालून पालखी 1 जुलै पर्यत 15 दिवस परंपरेप्रमाणे बेटावरच मुक्कामी ठेवण्यात येणार आहे.
या प्रस्थान सोहळ्याप्रसंगी भाविकांना उपदेश करताना महाराज पुढे म्हणाले की सरकार जे नियम करत आहे ते आपल्या समाजहितासाठी करत आहे कोरोना महामारीचे संक्रमन होऊ नये म्हणून सर्व आषाढी वारी पायी पालखी सोहळ्यास बंदी घालण्यात आली आहे. पंढरपुरला आपल्या मालकीचा मठ असूनही मालक म्हणून आपल्याला तिथं जाण्यास परवानगी नाही.कारन दोन महिन्यांपूर्वी शासनाने मठ ताब्यात घेतला आहे. आषाढी एकादशीला भक्त भेटायला यावा म्हणून पांडूरंग परमात्मा वाट पाहत असतो.अध्यात्मात मानसपुजेलाही महत्वाचे स्थान असते.प्रत्यक्ष गेलो नाही तरी घरी बसुन मानसपुजेत पायी वारीचे , चंद्रभागेच्या स्नानाचे चित्र डोळ्यासमोर ठेऊन पांडुरंगाचे दर्शन घेऊन संतुष्ट व्हाअसे शेवटी महंत रामगिरी महाराज म्हणाले.
या प्रस्थान सोहळ्याप्रसंगी शिष्यगण, विद्यार्थी यांचाच समावेश होता.यावेळी नवनाथ महाराज म्ह्स्के,मधु महाराज, बाळासाहेब महाराज रंजाळे,संदीप महाराज बाजाठान, मारूती महाराज गुंजाळ,चंदू महाराज,अमोल महाराज, भगवान महाराज डमाळे,संदिप जाधव महाराज, गोविंद महाराज मलीक, सोमनाथ, परमेश्वर,मधुसुदन महाराज, गणेश,विलास , शिवाजी आण्णा, डॉ सोमनाथ महाराज डॉ रविंद्र कोते, अशोक कारखाना संचालक बबनराव मुठे यांच्यासह तुळशी कळस महिला,चोपदार, झेंडेकरी, उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत