पडवळकर, साहेबांबद्दल बोलायला तुझी लायकी आहे का रे...! दीपक ढोकणेचा पारा चढला - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

पडवळकर, साहेबांबद्दल बोलायला तुझी लायकी आहे का रे...! दीपक ढोकणेचा पारा चढला

उंबरे:      वेबटीम देशाचे नेते शरद पवार हे माझे दैवत आहेत.  शेतकर्‍यांसाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले आहे. अशा या शेतकर्‍या...

उंबरे:     वेबटीम
देशाचे नेते शरद पवार हे माझे दैवत आहेत.  शेतकर्‍यांसाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले आहे. अशा या शेतकर्‍यांचा राजा असलेल्या शरदचंद्रजी पवार साहेबांबद्दल आक्षेपार्ह बोलण्याची त्या पडवळकराची लायकी आहे का ? भाजपाच्या वरीष्ठ नेत्यांच्या सांंगण्यावरून ‘वळवळ’ करणार्‍या या पडवळकराने पवार साहेबांची माफी मागावी, अन्यथा त्याची प्रतिकात्मक पुतळे बनवून जोडे मारो आंदोलन करून निषेध नोंदवून, असा इशारा राहुरी तालुका राष्ट्रवादी युवकचे नेते दीपक ढोकणे यांनी दिला आहे.


दीपक ढोकणे म्हणाले, पवार साहेबांबद्दल कुणीही काही वाईट बोलले तर खपवून घेणार नाही. पवार साहेब हे माझे दैवत आहेत. त्यांनी महाराष्ट्रासाठी आणि येथील शेतकर्‍यांसाठी, वेगवेगळ्या समाज घटकांसाठी दिलेले योगदान हे विसरून चालणार नाही. मात्र, कोण तो पडवळकर आला आणि पवार साहेबांबद्दल वाईटही बोलू लागला. त्याच्यात इतकी हिम्मत आली कुठून असा सवाल करून पवार साहेबांची माफी मागा अन्यथा तुम्हाला घराबाहेर पडणे मुश्कील होईल असा इशाराहीही ढोकणे यांनी दिली आहे. ढोकणे म्हणाले, पवार साहेब जेष्ठ आहेत, त्यांचा आदर करायला पाहिजे, पण भाजपची संस्कृती कशी आहे हे पडवळकर या पिल्लाने दाखवून दिले आहे, पुन्हा असे माझ्या नेत्याला कुणी दुखावले तर मी जीव घेईन किंवा देईन असा इशाराही या एका शेतकरी पुत्राने दिला आहे     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत