गलवान खोऱ्यात महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

गलवान खोऱ्यात महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण

लडाख:    पूर्व लडाख सीमेवर गलवान खोऱ्यात नदीवरील पुलाचे काम सुरू असताना दोन जवानांच्या पुराच्या तडाख्यातून वाचवताना महाराष्ट्राच्या सुपु...

लडाख:   
पूर्व लडाख सीमेवर गलवान खोऱ्यात नदीवरील पुलाचे काम सुरू असताना दोन जवानांच्या पुराच्या तडाख्यातून वाचवताना महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण आले आहे. सचिन विक्रम मोरे या या शूर जवानाचे नाव असून तो मालेगाव तालुक्यातील साकुरी येथील रहिवासी होता. सचिनच्या हौतात्म्याचे वृत्त धडकताच साकुरी गाव, मालेगाव तालुक्यासह महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे.
सध्या लडाखमधील गलवान खोऱ्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तणावाचे वातावरण आहे. १५-१६ जूनला येथे चीनी सैनिकांच्या हल्ल्यात २० भारतीय जवान शहीद झाले. याच भागात गलवान खोऱ्यात शूर जवान सचिम विक्रम मोरे तैनात होते. सचिन मोरे हे ११५ इंजिनियरिंग रेजिमेंटमध्ये आपली सेवा देत होते. गलवान खोऱ्यातील नदीवर पुलाचे काम सुरू होते. मात्र या नदीला अचानक पूर आला आणि त्यावेळी नदीवर काम करणारे दोन जवान पाण्यात पडले. पाण्याच्या प्रवाहाबरोबर ते वाहून जात असल्याचे पाहून त्यांना वाचण्याचे प्रयत्न जवान सचिन मोरे यांनी केले. वाहून जाणाऱ्या जवानांना वाचवत असतानाच सचिन मोरे यांना वीरमरण आले. ही घटना काल घडली. मात्र, आज सकाळी त्यांच्या कुटुंबीयांना घडलेल्या घटनेबाबत माहिती देण्यात आली.

मोरे यांची पुढील एक वर्षाची सेवा शिल्लक होती. शहीद जवान सचिन मोरे यांच्या पश्चात त्यांची पत्नी, दोन मुली, आई-वडील असे कुटुंब आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत