मुंबई: शेजारच्या अल्पवयीन मुलीला बळजबरी किस केल्याप्रकरणी मुंबईतील एका न्यायालयाने आरोपीला पॉक्सो अंतर्गत पाच वर्षांची शिक्षा सुनावली...
मुंबई:
शेजारच्या अल्पवयीन मुलीला बळजबरी किस केल्याप्रकरणी मुंबईतील एका न्यायालयाने आरोपीला पॉक्सो अंतर्गत पाच वर्षांची शिक्षा सुनावली. सध्या आरोपी आर्थर रोड तुरुंगात आहे. त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
पॉक्सो अंतर्गत तुरुंगवासाची शिक्षा सुनावलेल्या दोषीचं नाव अब्दुल रहमान महबूब लोहार (वय ३०) आहे. त्याला मुंबईतील आर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात आले आहे. दोषी लोहारला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने आरोपीला ५ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील अँटॉप हिलमधील झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने २९ जून २०१८ रोजी शेजारी राहणाऱ्या लोहार याच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्याची आठ वर्षांची मुलगी आहे. पीडितेचे वडील कामावरून घरी परतत होते. त्याचवेळी त्याच्या बहिणीचा फोन आला. तिने घटनेची माहिती दिली. त्याने तातडीने घरी धाव घेतली आणि नेमके काय घडले हे जाणून घेतले. घटनेबाबत पत्नी आणि मुलीने सर्व हकिकत सांगितली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत