जामखेड : तालुक्यातील डोणगाव येथे इयत्ता १२वी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थीनीचा मृतदेह विहीरीत तरंगताना आढळुन आल्याने तालुक्यात खळबळ उ...
जामखेड :
तालुक्यातील डोणगाव येथे इयत्ता १२वी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थीनीचा मृतदेह विहीरीत तरंगताना आढळुन आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. सदर मुलगी तीन दिवसांपासून बेपत्ता होती. या बाबत जामखेड पोलिस स्टेशनला नातेवाईकांनी मिसिंग दाखल केली होती. या प्रकरणी एका संशयितास पोलीसांनी ताब्यात घेतली आहे.
तालुक्यातील डोणगाव येथे इयत्ता १२वी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थीनीचा मृतदेह विहीरीत तरंगताना आढळुन आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. सदर मुलगी तीन दिवसांपासून बेपत्ता होती. या बाबत जामखेड पोलिस स्टेशनला नातेवाईकांनी मिसिंग दाखल केली होती. या प्रकरणी एका संशयितास पोलीसांनी ताब्यात घेतली आहे.
तालुक्यातील रत्नापुर येथील अल्पवयीन मुलगी डोणगाव येथे आजी आजोबा कडे आली होती ही मुलगी गुरवार दि १८ रोजी सायंकाळ पासुन बेपत्ता होती. त्यामुळे नातेवाईकांनी रात्रभर तिचा शोध घेतला पण ती सापडून न आल्याने मुलीचे आजोबा यांनी दुसर्या दिवशी म्हणजे शुक्रवार दि. १९ रोजी जामखेड पोलिस स्टेशनला मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली होती.या नंतर तिसर्या दिवशी शनिवार दि. २० रोजी सदर मुलीचा शोध घेत आसताना नातेवाईकांना तीचा मृतदेह सकाळी साडेदहा वाजता डोणगाव येथील तिच्या घरापासून अर्धा किलोमीटर अंतरावरील किन्हीचा ओढा येथिल विहीरीत तरंगताना आढळुन आला. यानंतर डोणगावचे पोलीस पाटील बिभीषण यादव यांनी सदर ची घटना जामखेड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांना कळवली त्यानंतर पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक संजय बोकील, पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी भोस, बाजीराव सानप, गणेश साने, अजय साठे, विष्णू चव्हाण, शेषराव म्हस्के यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली.
यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने सदरचा मृतदेह विहिरीच्या बाहेर काढण्यात आला व शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. वैद्यकीय अधीक्षक डॉ. युवराज खराडे यांनी शवविच्छेदन केले केले असून नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह देण्यात आला. या प्रकरणी मुलीचे वडील यांनी जामखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या खबरीवरुन जामखेड पोलिस स्टेशनला सध्या अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत