राहुरी : तालुक्यातील कोंढवड येथील अशोक रामभाऊ बर्डे (वय४१) या इसमाने राहत्या घरात छताला साडीच्या सह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याच...
राहुरी :
तालुक्यातील कोंढवड येथील अशोक रामभाऊ बर्डे (वय४१) या इसमाने राहत्या घरात छताला साडीच्या सह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी रात्रीच्या सुमारास घडली. आत्महत्येचे नेमकं कारण मात्र समजू शकले नाही.
दरम्यान गुरूवार दि. १७ रोजी अशोक हा रात्री आपल्या पत्र्याच्या घरामध्ये झोपला होता. सकाळी तो झोपेतून लवकर उठला नसल्याने शेजारीच राहत असलेल्या त्याची आई त्याला उठवण्यासाठी गेली असता तो घराच्या छताला साडीच्या साह्याने गळफास घेतलेल्या लटकलेल्या अवस्थेत दिसला. राहुरी पोलीसांना पोलिस पाटील सदाशिव तागड यांनी घटनेची माहीती दिली. पोलीस नाईक सोमनाथ जयभाय यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करून अकस्मात मृत्यूची नोंद करून अशोकचा मृतदेह राहुरी येथे पाठविला.
शवविच्छेदनासाठी पाठवला.
मयत अशोकच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ, एक मुलगा, मुली असा परिवार आहे. पुढील तपास राहुरी पोलिस करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत