मुंबई : वेबटीम लोकसभा निवडणुकीवेळी भाजपने माजी खासदार दिलीप गांधी यांची चांगली कामे असतानाही काँग्रेसमधून भाजपात आलेले राधाकृष्ण विखे प...
मुंबई : वेबटीम
लोकसभा निवडणुकीवेळी भाजपने माजी खासदार दिलीप गांधी यांची चांगली कामे असतानाही काँग्रेसमधून भाजपात आलेले राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजय विखे पाटील यांना निवडणुकीचं तिकीट देण्यात आलं. हे तिकीट का दिलं? यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर यांनी देवेंद्र फडणवीस यांची दिलखुलास मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. यात सुजय विखे पाटील यांना उमेदवारी का दिली?, भाजपच्या नेत्या मेधा कुलकर्णी यांना विधानपरिषदेत का संधी दिली नाही? अशा प्रश्नांवर फडणवीस यांनी मत मांडलं
“अहमदनगरमधील भाजपचे तत्कालीन खासदार दिलीप गांधी यांचं काम चांगलं होतं. त्यांनी मेहनतही भरपूर केली. पण आम्ही जे सर्वेक्षण केलं त्यात अँटी इन्कम्बन्सी आढळली. त्यामुळे आपण काही बदल करावं, असा आमचा विचार होता. अहमदनगरमध्ये उमेदवारीसाठी काही नावे होती. ती नावे असताना राधाकृष्ण विखे पाटील यांना पक्षात घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांच्या मुलाने लोकसभेसाठी जवळपास चार वर्षे मेहनत घेतली होती. त्यामुळे त्यांना उमेदवारी दिली”, असं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. तसेच गांधी हे व्यक्ती चांगले आहेत, त्यांनी कामंही केली आहेत. पण तरीही इन्कम्बन्सी दिसली. त्यामुळे आम्ही बदल केला. याचा अर्थ दिलीप गांधी राजकारणात संपले असं नाही. उद्या गांधी तुम्हा पु्न्हा दुसऱ्या कुठल्या पदावरती दिसतील. गांधी पुढे कदाचित आमदार, खासदार, विधानपरिषद किंवा राज्यसभेत दिसू शकतील”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
घेईलच”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत