अविनाश आदिकांना आमदारकीचे वेध ; विधांनपरिषदेसाठी जोरदार फिल्डिंग - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

अविनाश आदिकांना आमदारकीचे वेध ; विधांनपरिषदेसाठी जोरदार फिल्डिंग

श्रीरामपूर : वेबटीम          राज्यपालनियुक्त विधानपरिषदेच्या १२ जागा  रिक्त झाल्या असून यापैकी राष्ट्रवादी काँग्रेसला ४ जागा मिळणार आह...

श्रीरामपूर : वेबटीम       
 राज्यपालनियुक्त विधानपरिषदेच्या १२ जागा  रिक्त झाल्या असून यापैकी राष्ट्रवादी काँग्रेसला ४ जागा मिळणार आहेत, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस तथा बारामतीच्या पवार कुटुंबातील एक विश्वासू नातेवाईक समजल्या जाणाऱ्या अविनाश आदीक यांना  विधानपरीषदेवर संधी द्यावी, यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाल्याचे पहायला मिळत आहे.       श्रीरामपूर विधानसभा मतदार संघ हा आरक्षित असल्याने येथे ससाणे, आदिक, मुरकुटे या मातब्बरांची चांगलीच पंचाईत झाली आहे, त्यामुळे गेल्या काही पंचवार्षिकपासून या नेत्यांवर कांबळे, कानडे आदींचे झेंडे उचलण्याची वेळ आली आहे, असो, स्व. जयंतराव ससाणे गेल्यानंतर श्रीरामपूरची सत्ता आता आदिक घराण्याकडे एकवटताना दिसत आहे. स्व गोविंदराव आदिक यांचे श्रीरामपूरच्या विकासातील योगदान पाहता अनुराधा आदिक यांना जनतेने नगराध्यक्ष पदी संधी देऊन एक प्रकारे पुन्हा एकदा आदिक कुटुंबाला राजकारणात स्वीकारले आहे, आता अविनाश आदिक व भगिनी अनुराधा आदिक हे राष्ट्रवादीचे चांगल्या प्रकारे काम करत आहेत, त्यामुळेच त्यांच्यावर मोठ्या पवार साहेबांनी (शरद पवार) मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत, त्याचे फलित म्हणून आदीकाना श्रीरामपूरची जागा आघाडीला खेचून आणण्यात मोठी भूमिका बजावली आहे, त्यामुळे काँग्रेसचे लहू कानडे आमदार झाल्याचे लपविण्यासारखी गोष्ट नाही, आता योगायोगाने राज्यातही याच आघाडीचे सरकार आहे, राष्ट्रवादी सत्तेत आहे, आदिकांचे पक्षसाठी मोठे योगदान आहे, त्यामुळे आगामी विधानपरिषदेच्या जागेवर राष्ट्रवादी कडून त्यांना संधी मिळावी.   श्रीरामपूरचा विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी आता आदिक समर्थकांना अर्थात स्वतः अविनाश आदिकांना देखील विधानपरिषदेवर आपलीच वर्णी लागावी, अशी स्वप्न पडू लागले आहेत.त्यामुळेच सध्या श्रीरामपुरात पक्षच्या ऑनलाईन , मोहीमेत एक प्रकारे आदिकांंचार्म परफॉरमन्स नमूद केला जात आहे, यासाठी विशेष यंत्रणा कामाला लागली आहे, कार्यकर्त्यांचे फोन नंबर मिळवणे, त्यांना संपर्क करणे व त्यांचा अभिप्राय घेणे ( आदीकाना पोषक ठरेल असा) अशी साखळी कार्यरत दिसत आहे, या सर्व घडामोडींवरून आदीकाना आमदार होण्याची मोठी घाई झाल्याचेच दिसून येत आहे, एकीकडे अविनाश आदिक फिल्डिंग लावून असले तरी शरद पवार हेच काय ते ठरविणार आहेत. याशिवाय राष्ट्रवादीचे स्थानिक नेते मात्र अंधारात विखेंशी जुळवून घेतलेले माजी आमदार भानुदास मुरकूटे यांचेही मते जाणून घेतली जाणार आहेत, अर्थात यांच्या मताला तशी फारशी किंमतही राहिलेली नाही मात्र प्रोसेस म्हणून हे कागदी घोडे नाचेल, मात्र बारामती मध्ये जे ठरेल तेच होईल, आणि सध्या तरी आदीकाना फिलगुड असेच वातावरण दिसत आहे, हे नक्की

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत