दिल्ली:वेबटीम भारत आणि पाकिस्तानमध्ये वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इस्लामाबदमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. भारतीय उच्चायुक्त कार्य...
दिल्ली:वेबटीम भारत आणि पाकिस्तानमध्ये वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इस्लामाबदमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. भारतीय उच्चायुक्त कार्यालयासोबत काम करणारे दोन अधिकारी मागील काही तासांपासून बेपत्ता झाले असल्याचे समोर आले आहे. या अधिकाऱ्यांचा शोध सुरू आहे. भारताने पाकिस्तान सरकारकडे हा मुद्दा उपस्थित केला आहे. भारतातील पाकिस्तान उच्चायुक्तालयातील दोन गुप्तहेरांना भारतीय तपास यंत्रणांनी अटक केली होती. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीआयएसएफचे दोन वाहन चालक ड्युटीसाठी बाहेर गेले होते. मात्र, ते दोघेही इच्छित ठिकाणी पोहचले नाहीत. या वाहन चालकांचे अपहरण झाले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पाकिस्तान सरकारला याबाबतची माहिती देण्यात आली आहे. सकाळी ८.३० वाजल्यापासून या कर्मचाऱ्यांसोबतचा संपर्क तुटला असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, याआधी भारतीय राजनयिक गौरव अहुवालिया यांना पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयकडून त्रास दिला जात असल्याचे समोर आले होते. गौरव अहुवालिया यांना घाबरवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. अहुवालिया यांचा बाइकस्वाराकडून पाठलाग करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याशिवाय त्यांच्या सरकारी निवासस्थानाबाहेर संशयास्पद हालचाली करत असलेल्या काही अज्ञात व्यक्ती आढळल्या दिसल्या होत्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत