मुंबई : वेबटीम अॅपेंडिक्स हा आपल्या शरीरातील एक अवयव असून त्याला सूज आल्यास अपेंडिसाइटिसची समस्या निर्माण होते. अपेंडिसाइटिसची व्याधी ह...
मुंबई : वेबटीम

अॅपेंडिक्स हा आपल्या शरीरातील एक अवयव असून त्याला सूज आल्यास अपेंडिसाइटिसची समस्या निर्माण होते. अपेंडिसाइटिसची व्याधी हि खूप काळ व्यक्तीला त्रास देते. याच्या वेदना सहन करण्यापलीकडे असतात. तुम्ही कधी अपेंडिसाइटिस असणाऱ्या व्यक्तीला भेट दिलीत तर त्याचा त्रास तुम्हाला बघवणारही नाही. हा असा आजार आहे ज्याचा त्रास माणसाची जगण्याची इच्छा मारून टाकतो. या आजारावर उपचार तर खूप आहेत आणि हे उपचार त्वरित घ्यायला हवेत. एरंडेल तेल हे आयुर्वेदात सुद्धा खूप गुणकारी असल्याचे सांगितले आहे. फार पूर्वीपासून एरंडेल तेलाचा विविध आजारांवर आणि समस्यांवर उपयोग होत आला आहे. असं हे एरंडेल तेल अॅपेंडिक्सच्या सुजेवर आणि वेदनेवर अतिशय उपयुक्त ठरते. एरंडेल तेलात रिसिनोलिक अॅसिड आढळते ज्यात वेदना कमी करणारे आणि सूज कमी करणारे गुणधर्म व घटक असतात. एक मऊ कापड घ्यावे आणि दोन चमचा एरंडेल तेलात हा कपडा बुडवून काही वेळ ज्या ठिकाणी सूज आली आहे आणि वेदना होत आहे त्या भागावर लावावा. दिवसातून दोन वेळा असे केल्यास काही दिवसांत तुम्हाला यावर फरक दिसून येईल
कोणत्याही टिप्पण्या नाहीत