राहुरी फॅक्टरी : श्रीकांत जाधव ज्येष्ठ वद्य अमावस्या, रविवार दिनांक--२१/६/२०२०--रोजी कंकणाकृति सूर्यग्रहण होणार आहे. त्याबाबतीत सर्व माह...
राहुरी फॅक्टरी : श्रीकांत जाधव
ज्येष्ठ वद्य अमावस्या, रविवार दिनांक--२१/६/२०२०--रोजी कंकणाकृति सूर्यग्रहण होणार आहे. त्याबाबतीत सर्व माहिती पुढीलप्रमाणे.*
( विशेष सूचना--शनिवार दिनांक --२०/६/२०२० रोजी रात्री १०:०० वाजेपासून सूर्यग्रहणाचा वेध प्रारंभ होत आहे. त्यामुळे ग्रहणाचे वेध प्रारंभ किंवा चालू होण्यापूर्वी आपण सर्वांनी आपल्या घरातील, सर्व धान्यांमध्ये,सर्व पदार्थांमध्ये, पाण्याचा टाकीत, प्यायच्या पाण्यात आणि आंघोळीच्या पाण्यात सर्व ठिकाणी शनिवार दिनांक २०/६ /२०२० रोजी रात्री ९ ते ९:३० या दरम्यान तुळशीची पाने टाकावीत. असे केले असता ग्रहणकाळात सर्व धान्य आणि पाणी तसेच इतर पदार्थ शुद्ध राहतात. तसेच हे सूर्यग्रहण, संपूर्ण भारतातून दिसणार असल्याने आपण सर्वांनी ग्रहणासंबंधीत वेधाचे आणि ग्रहणाचे नियम पाळावेत.)
*सूर्यग्रहणाचा वेध---हे सूर्यग्रहण रविवारी दिवसाच्या दुसऱ्या प्रहरात असल्याने शनिवार दिनांक --२०/६/२०२० रोजी रात्री १० वाजेपासून वेध प्रारंभ होत आहे. त्यामुळे शनिवारी रात्री १० वाजेपासून ते रविवार दिनांक--२१/६/२०२० रोजी या दिवशी ग्रहण मोक्षापर्यंत म्हणजे दुपारी १:२८ वाजेपर्यंत सर्वांनी ग्रहणाचे वेध पाळावेत. तर लहान मुले,वृद्धव्यक्ती, आजारी व्यक्ती, अशक्त व्यक्ती आणि गर्भवती स्त्रियांनी रविवार दिनांक --२१/६/२०२० रोजी पहाटे ४:४५ वाजेपासून ते रविवार दिनांक--२१/६ /२०२० रोजी दुपारी ग्रहण मोक्षापर्यंत म्हणजे दुपारी १:२८ वाजेपर्यंत ग्रहणाचे वेध पाळावेत.
संपूर्ण वेधामध्ये आणि संपूर्ण ग्रहणाच्या कालावधी मध्ये स्वयंपाक आणि भोजन करू नये.वेधकाळात स्नान, जप,नित्यकर्म, देवपूजा, श्राद्ध ही कर्मे करता येतात. वेधकाळात आवश्यक असल्यास पाणी पिणे,मलमूत्रोत्सर्ग,झोप इ.कर्मे करता येतात.ग्रहणपर्व काळात मात्र(रविवार दिनांक--२१/६/२०२० रोजी सकाळी--१०:०१ वाजेपासून ते दुपारी--१:२८ वाजेपर्यंत पाणी पिणे, मलमूत्रोत्सर्ग, स्वयपाक करणे, भोजन करणे आणि झोपणे ही कर्मे करू नयेत.
रविवार दिनांक--२१/६/२०२० रोजी सूर्यग्रहण पर्वकाळ पुढीलप्रमाणे---- ग्रहण स्पर्श---सकाळी----१०:०१ वाजता
ग्रहण मध्य---दुपारी----११:३८ वाजता
ग्रहण मोक्ष---दुपारी १:२८ वाजता. एकूण सूर्यग्रहण पर्वकाळ---३तास:२७ मिनिटे
प्रत्यक्ष ग्रहण पर्वकाळातील म्हणजे रविवार दिनांक--२१/६/२०२० रोजी ग्रहणस्पर्श-- सकाळी १०:०१ वाजेपासून ते ग्रहण मोक्ष--दुपारी १:२८ वाजेपर्यंत या काळातील कृत्ये-----(ग्रहणस्पर्शापासून म्हणजे सकाळी १०:०१वाजेपासून ते ग्रहण मोक्षापर्यंतचा म्हणजे दुपारी १:२८ वाजेपर्यंत हा कालावधी ग्रहणाचा पुण्यकाल मानावा.)-- -- रविवार दिनांक--२१/६/२०२० रोजी सकाळी १०:०१ वाजता ग्रहणस्पर्श होताच स्नान करावे. पर्वकाळामध्ये देवपूजा, कोणत्याही देवतेचे स्तोत्र पठण,तर्पण, श्राद्ध, जप,होम,दान करावे. पूर्वी घेतलेल्या मंत्राचे पुरश्चरण ग्रहणात करावे. ग्रहण काळामध्ये झोप, मलमूत्रोत्सर्ग, अभ्यंग, स्वयंपाक करणे, भोजन करणे,पाणी पिणे व कामविषयसेवन करू नयेत. अशौच असता म्हणजे सुतक आणि सोयर असता ग्रहण पर्वकाळामध्ये ग्रहणासंबंधीत स्नान, दान करण्यापूर्ती शुद्धी असते.
ग्रहण पर्वकाळामध्ये गर्भवती महिलांनी आपल्या घरातील देवघरात बसून किंवा आपल्याला जमेल त्याप्रमाणे कोणत्याही देवतेचे स्तोत्र पठण करावे,जप करावा,गर्भवती महिलांनी अजिबात ग्रहण पाहू नये.आणि आपल्या घरात वेधकाळात आणि ग्रहण पर्वकाळामध्ये सूर्याची किरणे आपल्या घरात येऊ नये यासाठी आपल्या घराच्या सर्व खिडक्या आणि दारे बंद करावीत. गर्भवती महिलांनी ग्रहण पर्वकाळामध्ये भोजन करू नये आणि पाणी पिऊ नये.
मंत्र-तंत्र पुरश्चरणाबाबत---नवीन मंत्र घेण्यास व गृहीतमंत्राचे पुरश्चरण करण्यास सूर्यग्रहण हा मुख्यकाल आहे. पूर्वी घेतलेल्या मंत्राचे पुरश्चरण ग्रहण पर्वकाळामध्ये केल्याने मंत्रसिध्दी होते.
ग्रहणाचे राशिप्रमाणे फल---१) मेष,सिंह, कन्या, मकर या रयाशींना शुभफल आहे.
२) वृषभ,तुला,धनु,कुंभ या राशींना मिश्रफल आहे.
३) मिथुन, कर्क,वृश्चिक,मीन या राशींना अनिष्टफल आहे.
ज्या राशींना अनिष्टफल आहे त्यांनी आणि गर्भवती महिलांनी हे ग्रहण पाहू नये.
दिनेश विजय जोशी ( गुरू )
देवळाली प्रवरा ता. राहुरी
*8055424219*
*9096221631*
*घरी राहा , सुरक्षित राहा , काळजी घ्या* 🙏🙏🙏🙏

कोणत्याही टिप्पण्या नाहीत