दिल्ली : चीन सरकारचे वृत्तपत्र असलेल्या 'ग्लोबल टाइम्स'ने भारताला धमकी दिली आहे. जर गोळीबार करण्याचा आदेश खरा असेल तर भारत-चीन स...
दिल्ली :
चीन सरकारचे वृत्तपत्र असलेल्या 'ग्लोबल टाइम्स'ने भारताला धमकी दिली आहे. जर गोळीबार करण्याचा आदेश खरा असेल तर भारत-चीन सीमेवर असलेल्या दोन्ही बाजूंच्या सैन्यांमधील परस्पर विश्वास निर्माण करण्याच्या प्रक्रियेला धक्का लागणार असल्याचा इशारा दिला अग्रलेखात दिला आहे. दोन्ही देशांमधील सैन्यामध्ये वादावादी होते. मात्र, मागील काही दशकांपासून गोळी चालवण्यात आली नाही. जर, भारताने चीनच्या सैन्याविरोधात गोळी चालवली. तर सीमाभागात त्याचे पडसाद उमटणार असल्याची धमकी चीनने दिली आहे.
चीनच्या या वृत्तपत्राने म्हटले की, भारतीय सैन्य जर शस्त्रांशिवाय जिंकू शकत नाहीत. त्यामुळे हाती शस्त्र असले तरी ते जिंकणार नसल्याची दर्पोक्ती ग्लोबल टाइम्सने केली आहे. चिनची लष्करी ताकद भारतापेक्षा अत्याधुनिक आणि मजबूत असून १९६२ पेक्षा आजची स्थिती वेगळी नाही. चीनचा जीडीपी भारताच्या पाचपट मोठा असून चीनचा लष्करावरील खर्च भारतापेक्षा तीन पट अधिक असल्याचे मखलाशी 'ग्लोबल टाइम्स'ने केली

कोणत्याही टिप्पण्या नाहीत