राहुरी तालुका प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची कार्यकारणी जाहीर - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी तालुका प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची कार्यकारणी जाहीर

राहुरी प्रतिनिधी, पत्रकारांच्या समस्या जाणून घेवून त्या सोडविण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत कुटूंबा प्रमाणे काळजी घेतली जाई...

राहुरी प्रतिनिधी,
पत्रकारांच्या समस्या जाणून घेवून त्या सोडविण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत कुटूंबा प्रमाणे काळजी घेतली जाईल. असे प्रतिपादन प्रेस संपादक व पञकार सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुभाष चिंधे यांनी दिनांक २१ जून रोजी राहुरी येथील संघाची कार्यकारिणी जाहीर करताना केले. यावेळी मनोज साळवे व रमेश बोरूडे यांची तालूका उपाध्यक्ष पदी सर्वानुमते निवड करण्यात आली. 
       राहुरी येथील गाडगे महाराज आश्रम शाळेच्या सभागृहात दिनांक २१ मे रोजी सकाळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची नूतन कार्यकारीणी जाहीर करण्यासाठी तालुक्यातील कार्यरत पत्रकारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या प्रसंगी प्रा. चिंधे सर बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार  सुभाष मुदळ यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीचे प्रास्तविक करताना जेष्ठ पत्रकार रमेशराव बोरुडे म्हणाले कि, पत्रकार सेवा संघाच्या माध्यमातून पत्रकारांना येणाऱ्या समस्या, धावपळीच्या युगातील आरोग्य, आर्थिक स्थिती यासह शासनाच्या सुविधा पोहचविण्यासाठी प्रेस संपादक व पञकार सेवा संघटना कार्यरत राहून मार्गदर्शन करेल. तसेच पत्रकारांच्या संरक्षणासाठी व हक्क अधिकारांसाठी निश्चितपणे मदतीचा हात दिला जाईल. हे  आश्वासन देऊन नूतन कार्यकारिणीतील पदाधिकारी व सदस्यांचे अभिनंदन केले.
          प्रेस संपादक व पञकार सेवा संघाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र वाडेकर यांनी नूतन कार्यकारिणी जाहीर करून जिल्हाध्यक्ष सुभाष चिंधे यांनी संघटनेची दिलेली जबाबदारी सार्थकी लावली जाईल. हे स्पष्ट करत पत्रकार सेवा संघाच्या माध्यमातून पत्रकार बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशिल राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
याप्रसंगी नुतन कार्यकारीणीत तालुकाध्यक्ष राजेंद्र वाडेकर यांनी तालूका उपाध्यक्ष मनोज साळवे, उपाध्यक्ष रमेशराव बोरुडे, सचिव जालिंदर ढोकणे, प्रसिद्धी प्रमुख संतोष जाधव, सहसचिव अशोक मंडलिक, खजिनदार कमलेश विधाटे, सदस्यपदी प्रभाकर मकासरे, राजेंद्र पवार, कैलास देठे, सचिन ठुबे, दिपक दातीर, शरद पाचारणे, सतिष फुलसौंदर, मिनाष पटेकर, विलास गि-हे, रहेमान शेख, सुनिल सात्रळकर यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत