भारत आणि चीनमध्ये भडका उडविणारे गलवान खोरं नेमके कुठय, काय आहे त्याचे महत्व, एकदा वाचाच - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

भारत आणि चीनमध्ये भडका उडविणारे गलवान खोरं नेमके कुठय, काय आहे त्याचे महत्व, एकदा वाचाच

दिल्ली : वेबटीम प्रत्यक्ष ताबारेषेवर तणाव निवळण्यासाठी भारत आणि चीन यांच्यात लष्करी स्तरावर चर्चा सुरू असतानाच, सोमवारी रात्री गलवाण खोऱ्यात...

दिल्ली : वेबटीम प्रत्यक्ष ताबारेषेवर तणाव निवळण्यासाठी भारत आणि चीन यांच्यात लष्करी स्तरावर चर्चा सुरू असतानाच, सोमवारी रात्री गलवाण खोऱ्यात अचानक उसळलेल्या अभूतपूर्व संघर्षांमध्ये चीनचे ४३ सैनिक ठार झाल्याचे वृत्त आहे. भारताचेही २० जवान शहीद झाले असून, यात भारताच्या कर्नल हुद्दय़ाच्या लष्करी अधिकाऱ्याचा समावेश आहे. यामुळे उभय देशांदरम्यान तणाव वाढला आहे. अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीवर विचारविनिमय करण्यासाठी नवी दिल्लीत अत्युच्च पातळीवर रात्री उशिरापर्यंत बैठका सुरू होत्या. मात्र ज्या गलवाण खोऱ्यामध्ये ही परिस्थिती निर्माण झाली आहे ते दोन्ही देशांसाठी इतके महत्वाचे का आहे? कुठे आहे गलवाण खोरं? मागील काही दिवसांपासून भारत आणि चीनदरम्यान प्रत्यक्ष ताबारेषेवर (एलएसी) मागील काही दिवसांपासून तणाव वाढला आहे. याच दरम्यान गलवाण खोरे हे नाव बातम्यांमधून अनेक समोर आहे. हा प्रदेश गलवाण नदीला लागून असल्याने त्याला गलवाणचे खोरे असं म्हणतात. दोन्ही देशांसाठी हा प्रदेश अत्यंत महत्वाचा आहे. जर या नदीच्या पलीकडील बाजूवर आपलं नियंत्रण नसेल तर भारत अक्साई चीन पठारापर्यंत सहज पोहचेल असं चीनला वाटतं. असं झाल्यास या भागात चीन दोन पावलं मागे गेल्यासारखी परिस्थिती निर्माण होईल. हीच गोष्ट लक्षात घेत भारतही या प्रदेशामधून मागे घटण्यास तयार नाहीय. १९६२ पासून शांतच पण. गलवाण नदी ही लडाखच्या पूर्वेकडील भाग आहे. चीनला भारतीय ध्वज दिसावा म्हणून या भागांमध्ये काही सैनिकी चौक्या उभारण्यात आल्या आहेत. मात्र या भागांमध्ये केवळ टेहाळणीसाठी उभारतात त्या प्रमाणे साध्या चौक्या उभारण्यात आल्या आहेत. मात्र या चौक्यांवर आपलेच नियंत्रण रहावे म्हणून भारताला सतत चीनबरोबर संघर्ष करावा लागत असल्याचे दिसून येतं. १९६२ च्या भारत चीन युद्धानंतर या परिसरामध्ये विशेष असं काहीच घडलं नाही. मात्र मागील चार ते पाच वर्षांपासून या भागामध्ये चीन सतत काही ना काही खुरापती काढताना दिसत आहे. चीनने बांधले रस्ते २०१६ साली चीनने गलवाण खोऱ्याच्या मध्यापर्यंत पक्का रस्ता बांधला. याच भागातील अनेक लष्करी चौक्यांपर्यंत चीनने पक्के रस्ते बांधले आहेत. या ठिकाणी चीनी सैनिक सतत पाहरा देताना दिसतात. येथूनच अगदी ४० ते ५० किमी आतमध्ये चीनचे मोठे लष्करी तळ आहे. पूर्ण खोऱ्यावर चीनला हवं आहे नियंत्रण गलवाण खोऱ्यावर चीनला एकहाती वर्चस्व हवे आहे. भारतानेही या भागामध्ये रस्ते निर्माण केले तर या भागावर भारताची पकड अधिक मजबूत होईल आणि हे राजकीय दृष्ट्या चीनच्या डोळ्यात खुपणारं आहे. भारताने या भागामध्ये अधिक सक्षम होण्याच्या सर्व प्रयत्नांना चीनचा विरोध आहे. मात्र भारत सरकारने लडाखबरोबरच गलावण खोऱ्यामध्ये सध्या सुरु असणारे काम थांबवले जाणार नाही असं सांगितले आहे. गरजेप्रमाणे या भागामध्ये रस्ते आणि इतर सुविधा उभारल्या जातील असं भारत सरकारने स्पष्ट केलं आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत