भंडारदरा - आपल्या पारंपरिक व्यवसायाला फाटा देत भंडारदरा (शेंडी) येथील सलुन व्यावसायिकांनी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी चप्पल बुट व रेनकोट...
भंडारदरा -

आपल्या पारंपरिक व्यवसायाला फाटा देत भंडारदरा (शेंडी) येथील सलुन व्यावसायिकांनी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी चप्पल बुट व रेनकोट, कागद व्यवसाय सुरू केला आहे.
भंडारदरा (शेंडी) येथे गेल्या ३० ते ३५ वर्षापासून साहेबराव नामदेव पंडित व आदेश अनंत जाधव याचा वडिलोपार्जित पारंपरिक सलुन व्यवसाय आहे. मात्र कोरोना रोगाच्या ामुळे देशभरात हळुहळू नियम व अटी शिथिल करुन इतर व्यवसाय सुरू करण्यात आले असले तरी मध्यंतरी काही दिवस सदर व्यवसायाला परवानगी दिली होती मात्र कालांतराने सलुन व्यवसाय पुन्हा बंद करण्यात आले त्यामुळे यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली सरकार व्यवसाय पुन्हा सुरू करण्यास परवानगी देत नसल्याने करायचे काय आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा या विवंचनेत असताना भंडारदरा शेंडी येथील साहेबराव नामदेव पंडित या तरुणांने चप्पल बुट व्यवसाय सुरू केला व चांगले उत्पन्न मिळवुन लागला हे लक्षात घेऊन आदेश अनंत जाधव याने देखील पावसाळा सुरू होतोय व परिसरात होणाऱ्या पर्जन्यमानाचा अंदाज घेऊन पावसाळी ड्रेस, रेनकोट यांचा व्यवसाय सुरू करत आपल्या पारंपरिक वडिलोपार्जित व्यवसाय बंद करून नवीन व्यवसाय सुरू केला मात्र सदर व्यवसाय आम्ही फक्त आमच्या कुटुबांवर उपासमार होवु नये म्हणून करत असून आम्हाला आमचा पारंपरिक व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार कधी परवानगी देणार या कडे लक्ष ठेवून असल्याचे सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत