लायन्स क्लबच्या मल्टीपल कौन्सिल चेअरमनपदी गिरीश मालपाणी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

लायन्स क्लबच्या मल्टीपल कौन्सिल चेअरमनपदी गिरीश मालपाणी

संगमनेर लायन्स क्लबच्या इंटरनॅशनलच्या मल्टीपल कौन्सिल चेअरमनपदी माजी प्रांतपाल गिरीश मालपाणी यांची एकमताने निवड झाली आहे. महाराष्ट्रातील प्र...

संगमनेर लायन्स क्लबच्या इंटरनॅशनलच्या मल्टीपल कौन्सिल चेअरमनपदी माजी प्रांतपाल गिरीश मालपाणी यांची एकमताने निवड झाली आहे. महाराष्ट्रातील प्रचंड विस्तारलेल्या चार लायन्स प्रांतांचे नेतृत्व करण्याची जबाबदारी मालपाणी यांच्याकडे मोठ्या विश्वासाने सोपविण्यात आली आहे. महाराष्ट्रात लायन्स क्लबचे एकूण चार प्रांत आहेत. त्यामध्ये 18 हजारांहून अधिक लायन्स सभासद आहेत. नुकत्याच या चारही प्रांतांच्या 2020-21 या वर्षासाठी प्रांतपाल निवडीची प्रकि‘या पार पडली. मराठवाडा, खानदेशचे प्रांतपाल म्हणून विवेक अभ्यंकर, पुणे, नगर, नाशिकच्या प्रांतपालपदी अभय शास्त्री, विदर्भाच्या प्रांतपालपदी संदीप खंडेलवाल तर कोकण व पश्चीम महाराष्ट्राच्या प्रांतपालपदी रवींद्र देशपांडे यांची निवड झाली आहे. . या कौन्सिलमध्ये चेअरमन गिरीश मालपाणी (संगमनेर ) व्हाईस चेअरमन म्हणून जितेंद्र जोशी (बार्शी), सेक‘ेटरी म्हणून नितीन बंग (खानदेश), खजिनदार म्हणून जीवनचंद्र निर्वाण (विदर्भ) यांचीही निवड करण्यात आली आहे. जुलै महिन्यात पदग‘हण सोहळा होईल असे क्लबच्या वतीने सांगण्यात आले आहे. कौन्सिल चेअरमनपदी त्यांची निवड झाल्याबद्दल लायन्सचे माजी इंटरनशनल डायरेक्टर प्रवीण छाजेड (अहमदाबाद), माजी प्रांतपाल राज मुछाल, मालपाणी उद्योग समूहाचे चेअरमन राजेश मालपाणी, डॉ.संजय मालपाणी, मनीष मालपाणी, आशीष मालपाणी, स्वदेश उद्योग समूहाचे बाळासाहेब देशमाने, लायन्स क्लब ऑफ संगमनेर सफायरचे अध्यक्ष धनंजय धुमाळ, अभिनंदन केले असून आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत