पंतप्रधान मोदींचा धक्कादायक खुलासा ; 20 पक्षीय बैठकीत केले वक्तव्य - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

पंतप्रधान मोदींचा धक्कादायक खुलासा ; 20 पक्षीय बैठकीत केले वक्तव्य

नवी दिल्ली :   भारत-चीन सीमेवर नेमकं झालंय तरी काय, कशी झाली ही घटना हे सगळे प्रश्न देशाला पडले असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सी...

नवी दिल्ली : 
भारत-चीन सीमेवर नेमकं झालंय तरी काय, कशी झाली ही घटना हे सगळे प्रश्न देशाला पडले असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सीमेवरील हिंसक झटापटीबाबत वक्तव्य समोर आलं. देशातल्या 20 राजकीय पक्ष प्रमुखांच्या बैठकीत त्यांनी सांगितलं की, "आपल्या सीमेत ना कुणी घुसखोरी केली ना कुणी आपल्या पोस्टवर ताबा मिळवला." पण या वक्तव्यात आणि सरकारच्याच अनेक वक्तव्यांमध्ये विरोधाभास आहेत. कारण गलवान खोऱ्यात झालेल्या घटनेवर परराष्ट्र मंत्रालयाचं जे अधिकृत वक्तव्य आलं होतं त्यात याच्या बरोबर विरोधी सूर आहे.

दोन्ही देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांची घटनेनंतर फोनवर बातचीत झाली. त्यानंतर भारतीय परराष्ट्र खात्याने हे वक्तव्य जाहीर केलं होतं. 6 जून रोजी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरचा तणाव करण्याबाबत दोन्ही देशांच्या मिलिट्री कमांडरची बैठक झाली. त्यात अनेक मुद्द्यांवर सहमती झाली होती. पण ही प्रगती दिसत असतानाच चिनी बाजूने नियंत्रण रेषेच्या भारतीय हद्दीत एक बांधकाम उभारण्याचा प्रयत्न झाला. यावरुनच वाद सुरु झाला आणि नंतर चीनने आधीच कट केल्याप्रमाणे ही हिंसाचाराची घटना घडवली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत