अहमदनगर: वेबटीम श्रीगोंदा तालुक्यात शेततळ्यात बुडून चार भावंडांचा बुडून मृत्यू झाला आहे. बाबुर्डी गावात आज, मंगळवारी दुपारी ही दुर्दैव...
अहमदनगर: वेबटीम
श्रीगोंदा तालुक्यात शेततळ्यात बुडून चार भावंडांचा बुडून मृत्यू झाला आहे. बाबुर्डी गावात आज, मंगळवारी दुपारी ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे उत्तर प्रदेशातून गुऱ्हाळावर कामाला आलेल्या या मजूर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील बाबुर्डी गावात ही घटना घडली. उत्तर प्रदेशातील काही मजूर या गावातील उसाच्या गुऱ्हाळवर कामाला आलेले आहेत. त्यांची मुले मंगळवारी दुपारी येथील एका शेततळ्यात पोहण्यासाठी गेली होती. त्यामध्ये चार भावांचा तळ्यात बुडून मृत्यू झाला. सात ते पंधरा वयोगटातील ही मुले आहेत. पोलीस घटनास्थळी पोहचले आणि ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आले. मृत मुलांची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत. पुढील चौकशी सुरू आहे. ही मुले तळ्यात पोहण्यासाठी गेली आसावीत. तळ्यातील प्लास्टिकच्या कागदामुळे ती घसरून पडली. एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात त्यांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत