नेहरू भाजी मार्केट मधी भाजीपाला विक्रीस परवानगी मिळावी - सौदागर - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

नेहरू भाजी मार्केट मधी भाजीपाला विक्रीस परवानगी मिळावी - सौदागर

श्रीरामपूर …वेबटीम  नेहरू भाजी मार्केट मार्च महिन्यात लॉक डाऊन झाल्यापासून बंदच आहे तरी नेहरू मार्केट मधील किरकोळ भाजी विक्रेत्यांवर भाज...

श्रीरामपूर …वेबटीम 
नेहरू भाजी मार्केट मार्च महिन्यात लॉक डाऊन झाल्यापासून बंदच आहे तरी नेहरू मार्केट मधील किरकोळ भाजी विक्रेत्यांवर भाजी मार्केट बंद असल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे.
यातील बरेचसे भाजी विक्रेते वयोवृद्ध असून ते फिरून भाजीपाला विक्री करू शकत नाही नगरपालिकेने सर्व व्यवसायांना परवानगी दिली आहे परंतु नेहरू भाजी मार्केटला परवानगी दिली नाही आज येथेच शहराच्या सगळ्यात भागात काही लोक नव्याने भाजीपाला विक्री करीत आहेत त्यांना मात्र रस्त्यावर बसण्यास परवानगी आहे मात्र अनेक वर्षापासून मार्केटमध्ये भाजीपाला व्यवसाय करून उदरनिर्वाह करत असणारे भाजीपाला विक्रेत्यांची मात्र उपासमार होत आहे.
म्हणूनच सकाळी नेहरू मार्केट मधील सर्व भाजी विक्रेत्यांनी श्रीरामपूरचे तहसीलदार प्रशांत पाटील साहेब यांना भाजी मंडई चालू करण्याच्या बाबत यावेळी भाजपाचे संघटन सरचिटणीस सतीश सौदागर व संपर्क अभियान शहर संयोजक विशाल अंभोरे,संजय यादव ,शहर उपाध्यक्ष गणेश परदेशी, महेंद्र शेटे नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले याप्रसंगी उपस्थित नेहरू भाजी मार्केटमधील भाजीविक्रेते सतीश अहिरे, कैलास महाजन ,ह.वा. बागवान ,सौ. सुशीला तरटे ,सौ प्रभूने बाई ,अंजनाबाई राहिले ,सौ. आढाव सुरेखा लोखंडे, आदी महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत