संगमनेर : वेबटीम तालुक्यातील प्रतापपूर शिवारातील रात्री बिबट्याने दुचाकीवरुन चाललेल्या सादिक फकिरमंहम्मद शेख (वय - २३, रा. माळेवाडी, ता...
संगमनेर : वेबटीम
तालुक्यातील प्रतापपूर शिवारातील रात्री बिबट्याने दुचाकीवरुन चाललेल्या सादिक फकिरमंहम्मद शेख (वय - २३, रा. माळेवाडी, ता. संगमनेर) याच्यांवर जीवघेणा हल्ला करत गंभीर जखमी केल्याने परिसरात दहशत निर्माण झाली आहे.
सादिक फकिरमंहम्मद शेख हे चुलते अहमद हुसेन शेख यांना सोडवण्यासाठी निमगावजाळीला दुचाकीवरुन चालले होते. यावेळी प्रतापपूर शिवारातील आश्वी - निमगावजाळी रस्तावरील चतुरे वस्तीलगत रस्त्याच्या कडेला अंधारात बिबट्याचे पिल्लू दोघाना नजरेस पडले. त्यामुळे घाबरलेल्या सादिक व हुसेन यांनी दुचाकी थांबवून बिबट्या व त्यांच्या पिल्लाचा मागोवा घेतला. दुचाकी थाबल्याचे पाहून उजाडामुळे पिल्लू अंधारात निघून गेले. त्यानतंर सादिक व हुसेन शेख यांनी तेथून पुढे जाण्याचा प्रयत्न केला असता शंभर फूटावर गेल्यानंतर अंधारात दबा धरुन बसलेल्या मादी बिबट्याने त्याच्या दुचाकीवर झेप घेतली. त्यामुळे सादिक व अहमद शेख खाली कोसळले. यावेळी मादी बिबट्याने त्याचाकडे मोर्चा वळवळत सादिक याला चावे घेतल्यामुळे दोघानीही मोठ्याने आरडाओरडा केला. त्यामुळे मादी बिबट्या तेथून निघून गेली. तर आपल्या पिल्लाला या दोघानी त्रास दिल्याची भावना या मादी बिबट्याची झाली असावी. अशी भावना नागरीकानी बोलून दाखवली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत