शिर्डी : वेबटीम उसनवारी घेतलेल्या अवघ्या दोनशे रुपयेसाठी एकाचा भोकसून खून केल्याची घटना शिर्डी शहरात घडली आहे. रस्त्यावर मजूरीचे काम करण...
शिर्डी : वेबटीम
उसनवारी घेतलेल्या अवघ्या दोनशे रुपयेसाठी एकाचा भोकसून खून केल्याची घटना शिर्डी शहरात घडली आहे. रस्त्यावर मजूरीचे काम करणा-या अमित प्रेमजी सोला याचा आज उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून पोलीसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.
राज्यात अजूनही लॉकडाऊन असून थोड्याशा पैशासाठी मजूरांची मारामार होतांना दिसत आहे. यामुळेच शहरात मागील पंधरवाड्यात एकाची थोड्याशा पैशासाठी हत्या करण्यात आली होती. ही घटना ताजी आसतांनाच पुन्हा एकदा मजूराची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे.
याबाबत आधिक माहिती अशी की, अमित प्रेमजी सोला हा मुळचा वसई ठाणे येथील रहिवाशी असून शिर्डी नजिक चारी नंबर 11 येथे वॉचमनचे काम करत होता. यादरम्यान त्याची ओळख आरोपी इकराम निजाम पठाण वय 40 वर्षे याच्या सोबत झाली.
दोघे मित्र बनले त्यात त्यांनी पैशाची देवाणघेवाण केली. आरोपी इकराम याच्याकडून मयत अमित सोला याने दोनशे रुपये उसनवारी घेतले होते. सध्या लॉक डाऊन असल्याने पैशाची चणचण भासत होती म्हणून मयत अमित याने शहरातील रस्त्याच्या कडेला सुरु असलेल्या पाईपचे काम केले यात त्याला 350 रुपये हाजेरी मिळाली. याच दरम्यान आरोपी इकराम हा देखील तिथे आला आणि अमितकडे उसनवारी दिलेल्या पैशाची मागणी केली. यात त्याची बाचाबाची झाली आणि त्यानंतर आरोपीने (दि.22)अमितला रस्त्यावरील पदचारी मार्गावर चाकून भोकसले.
जखमीला लोणी येथे PMT मधे उपचारासाठी दाखल केले असता त्याचा आज दि.24 रोजी सकाळी 9 वाजता मृत्यू झाला असल्याचे शिर्डी पोलीस सहा.पोलीस निरिक्षक दिपक गंधाले यांनी सांगीतले आहे.
पोलीसांनी आरोपीचे नाव निष्पण केले असून आरोपी इकराम निजाम पठाण रा.श्रीरामनगर शिर्डी हा फरार आहे, पोलीस त्याचा शोध घेत असून पोलीसांनी घटनास्थळी पाहणी केली आहे. तर त्याच बरोबर वरिष्ठांच्या मार्गदर्शनखाली पुढील तपास करत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत