कोपरगावात निकृष्ट बियानामुळे दुबार पेरणीचे संकट ; आमदार काळे यांनी केली पाहणी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोपरगावात निकृष्ट बियानामुळे दुबार पेरणीचे संकट ; आमदार काळे यांनी केली पाहणी

कोपरगाव : वेबटीम  विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या महाबीज व ग्रीनगोल्ड कंपनीच्या बाजरी, मका, सोयाबीन आदी पिकांचे बियाणे ...

कोपरगाव : वेबटीम 
विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या महाबीज व ग्रीनगोल्ड कंपनीच्या बाजरी, मका, सोयाबीन आदी पिकांचे बियाणे निकृष्ट असल्याने बियाणांची उगवण झालेली नाही व शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. सदर नुकसानीची पाहणी करण्याचे आदेश नुकतेच आमदार मा. श्री. आशुतोषदादा काळे यांनी कृषी विभागाला दिले होते. त्याप्रमाणे आज आमदार मा. श्री. आशुतोषदादा काळे यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. रामसिंग व कृषी विभागाचे अधिकारी यांच्या समवेत चांदेकसारे व कोकमठाण येथे जाऊन पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली.

यावेळी आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी शेतकऱ्यांना कंपनीकडून नुकसान भरपाई मिळावी तसेच उच्च प्रतीचे बियाणे उपलब्ध करून द्यावे अशा सूचना केल्या.

यावेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ डॉ. रामसिंग, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे,  तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव, पंचायत समिती कृषी अधिकारी पंडितराव वाघीरे, कृषी पर्यवेक्षक संजय धनकुटे, कृषी अधिकारी पांडुरंग जाधव, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक आनंदराव चव्हाण, सुधाकर रोहोम, रोहिदास होन, डॉ. रोकडे, कोपरगाव जिनिंग व प्रेसिंगचे संचालक सुदामराव लोंढे, विजय रक्ताटे, महेश लोंढे, विजय थोरात आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत