जिल्ह्यात एकाच दिवशी २४ नवे रुग्ण ;वाचा कुठं कुठं आहेत रुग्ण - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

जिल्ह्यात एकाच दिवशी २४ नवे रुग्ण ;वाचा कुठं कुठं आहेत रुग्ण

अहमदनगरः    ःवेबटीम       जिल्ह्यात  एकाच दिवशी  २४ नवे रुग्ण  आढळले . आता एकूण रुग्ण संख्या ३२८, सध्या ६२ रुग्णांवर उपचार सुरू आहे. आज...

अहमदनगरः  ःवेबटीम   
  जिल्ह्यात  एकाच दिवशी  २४ नवे रुग्ण आढळले. आता एकूण रुग्ण संख्या ३२८, सध्या ६२ रुग्णांवर उपचार सुरू आहे. आज सकाळीआढळलेल्या २४ रुग्णांपैकी तब्बल १५ रुग्ण हे नगर शहरातील  आहे.
नगर जिल्ह्यामध्ये असणाऱ्या करोना बाधित रुग्णांचा या आजरातून बरा होण्याचा वेग वाढला होता. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ५०च्या आतमध्ये आली होती. त्यामुळे लवकरच जिल्ह्यात करोना परिस्थिती नियंत्रणात येईल, असे वाटत होते. मात्र आजची सकाळ नगरकरांसाठी चिंतेत भर टाकणारी ठरली आहे.
  
आज जिल्ह्यात तब्बल २४ करोना बाधित आढळले आहेत. यामधील १५ करोना बाधित हे नगर शहरातीलच आहेत. नगर शहरात आज आढळलेल्या बाधितांमध्ये तोफखाना परिसरातील ७, सिद्धार्थ नगर भागातील ४, नालेगाव भागातील १, बालिकाश्रम रोड वरील १ व दिल्लीगेट भागातील २ जणांचा समावेश आहे. नगर शहरामध्ये एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे महापालिका यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. ज्या भागात रुग्ण आहेत तेथील भाग सील करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. तसेच रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांना ताब्यात घेण्याचे कामही आरोग्य विभागाने तातडीने सुरू केले आहे. दरम्यान, याशिवाय आज संगमनेर तालुक्यात तीन श्रीरामपूर तालुक्यात एक व जामखेड तालुक्यातील एक असे आणखी पाच रुग्ण आढळले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत