श्रीरामपूर : सरकारने बंदी घातलेले एचटीबीटी कपाशी लागवड करुन आपण सविनय कायदेभंग आंदोलन सुरू केले असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे तालुकाध्...
श्रीरामपूर :
सरकारने बंदी घातलेले एचटीबीटी कपाशी लागवड करुन आपण सविनय कायदेभंग आंदोलन सुरू केले असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष निलेश शिवाजीराव शेडगे यांनी दिली आहे.
शेडगे म्हणाले, महांकाळ वाडगाव येथे आपली शेती आहे. शेतकर्यांसाठी अत्यंत उपयुक्त असे एचटीबीटी नविन तंत्रज्ञान आहे. एचटीबीटी म्हणजे तन नाशकाला सहनशील असे वाण. यामुळे कपाशी पिकात तन व्यवस्थापन करण्याकरीता तननाशक वापरता येते. अगदी राऊंड अप हे तननाशक चालते. त्यामुळे खुरपणी व निंदनीच्या खर्चात खूप मोठी बचत होते. तसेच या वाणाला गुलाबी बोंड अळी येतच नाही. त्यामुळे किटकनाशक फवारणीची गरजच पडत नाही. किटकनाशक फवारणीचा पण खुप मोठा खर्च वाचतो आहे.
मी मागच्या वर्षीपण हेच बियाणे लागवड केली होती. या वर्षी पण मी प्रतिबंधित एचटीबीटी कपाशी लागवड करुन मै भी गुन्हेगार हे सविनय कायदेभंग आंदोलन सुरु केले आहे. माझ्या सोबत गावातील जितेंद्र जैन, सर्जेराव चोरमल, भानुदास चोरमल, शुभम कुलथे, नाना कारले, राजेंद्र आढाव या शेतकर्यांनी ही कपाशी लागवड करुन या आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला आहे. सोबत संघटनेचे जिल्हाध्यक्ष बापुसाहेब आढाव होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत