अहमदनगर ः वेबटीम लॉकडाउनच्या काळात लग्नासाठी कमी खर्च येत असल्याचे पाहून अनेक गरीब वधूपित्यांनी अल्पवयीन मुलींची लग्नंही उरकून घेण्याचा ...
अहमदनगर ः वेबटीम
लॉकडाउनच्या काळात लग्नासाठी कमी खर्च येत असल्याचे पाहून अनेक गरीब वधूपित्यांनी अल्पवयीन मुलींची लग्नंही उरकून घेण्याचा सपाटा लावल्याचे चाइल्ड लाइनकडे प्राप्त होणाऱ्या तक्रारींवरून दिसून येत आहे. लॉकडाउन काळात एकट्या नगर जिल्ह्यात असे २० बालविवाह चाइल्ड लाइनने रोखले आहेत.
ग्रामीण भागात ऊस तोडणी कामगार, मजूर, गरीब शेतकरी यांच्यासाठी मुलींचे लग्न हे आव्हानच मानले जाते. समाजासोबत राहण्यासाठी रुढी-परंपरा, मानपान यांचे पालन करीत लग्न करायचे म्हणजे डोक्यावर कर्जाचा डोंगर असे चित्र अनेकदा पहायला मिळते. लॉकडाउनच्या काळात केवळ पन्नास लोकांच्या उपस्थितीत आणि घरच्या घरी लग्न करण्यास सरकारने मुभा दिली. अर्थातच नाईलाजानं का होईना, याला समाजमान्यताही मिळाली. हीच संधी समजून अनेक गरीब वधूपित्यांनी कायद्याच्या अज्ञानातून तर कुठे नाइलाजातून आपल्या मुली उजविण्यास सुरुवात केल्याचे आढळून येत आहेत. कारण एकट्या नगर जिल्ह्यात लॉकडाउन काळात जवळपास वीस बालविवाह चाइल्ड लाइनने रोखले आहेत. गेल्या आठवड्याचीच आकडेवारी पाहता चाइल्ड लाइनच्या पथकाने शेवगाव, पारनेर, अकोले, पाथर्डी व नगर या पाच तालुक्यांमध्ये प्रत्येकी एक असे एकूण पाच बालविवाह रोखले आहेत. यासाठी त्यांना जिल्हा बाल कल्याण समिती, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, पोलीस प्रशासन, बालविकास प्रकल्प अधिकारी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका आदींची मदत झाली आहे. अर्थात यंत्रणेपर्यंत माहिती न पोहचलेले असे अनेक लग्न झाले असल्याची शक्यता नाकारता येत नाही, महाराष्ट्र टाईम्सने हे वृत्त दिले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत