संगमनेर / संगमनेर शहर आणि तालुक्यात कोरोनाबधित रुग्ण कमी होण्याऐवजी वाढतच चालले आहेत त्यात बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे घुलेवाडी येथील ग्...
संगमनेर /

संगमनेर शहर आणि तालुक्यात कोरोनाबधित रुग्ण कमी होण्याऐवजी वाढतच चालले आहेत त्यात बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयाततील कोरोना केअर सेंटर मधून अगोदर चार तर सोमवा री सहा असे दहा रुग्ण बरे झाले असून आजपर्यंत जिल्हा रुग्णालयातून 4 अशा 57 जणांना घरी सोडण्यात आले अस ल्यामुळे संगमनेरकरांना दिलासा मिळाला आहे दरम्यान, अकोलेतील समशेरपूर येथेही कोरोना नवा रुग्ण सापडला आहे.
संगमनेर तालुक्यात दि 24 मे पासून दररोज कोरोनाबधित रुग्ण वाढत आहे दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा निमोण येथील एकाच कुटुंबातील एका 13 वर्षीय मुलीसह 30 आणि 31 वर्षीय दोन महिलांना कोरोनाची लागण झाली आहे परंतु हे तिन्ही रुग्ण दोडी ता सिन्नर येथील रुग्णाच्या संपर्कातील असल्याची माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी दिली संगमनेर शहरातील मदिना नगर नायकवाडपुरा रहेमत नगर भारत नगर आणि मोमीनपुरा या भागात आज पर्यंत कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत मात्र शहराच्या मध्यवर्ती भाग असणाऱ्या इंदिरा नगर भागातील एका 57 वर्षीय महिलेलाही कोरोनाची लागण झाली असल्याचा अहवाल प्रशासनास प्राप्त झाला असून त्या महिलेस कोणाकडून कोरोनाचा संक्रमण झाले आहे आणि ती महिला कुणाच्या संपर्कात आली त्याचा प्रशासन शोध घेत असल्याचे तहसीलदार अमोल निकम यांनी संगीतले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत