नवी दिल्ली : लडाखच्या गलवान खोऱ्यात (Galwan Valley) सोमवारी मध्यरात्री झालेल्या हिंसक झटापटीत (india china border news latest updates) भा...
नवी दिल्ली :

लडाखच्या गलवान खोऱ्यात (Galwan Valley) सोमवारी मध्यरात्री झालेल्या हिंसक झटापटीत (india china border news latest updates) भारताचे २० जवान हुतात्मा झाले आहेत. या घटनेत चीनलाही मोठं नुकसान सोसावं लागल्याचं समोर येतंय. चीनच्या जखमी आणि मृत्युमुखी पडलेल्या जवानांची संख्या जवळपास ४३ असल्याचं सांगण्यात येतंय. चीनच्या मृत्युमुखी पडलेल्या सैनिकांममध्ये सेनेचा कमांडिंग ऑफिसर असल्याचंही समजतंय. उल्लेखनीय म्हणजे, चीननं अद्याप आपल्या मारल्या गेलेल्या सैनिकांबद्दल किंवा जीवितहानीबद्दल काहीही माहिती दिलेली नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत