मुंबई ः वेबटीम करोनाचा संसर्ग होईल या भीतीनं पुण्यातील एका रिक्षाचालकानं आत्महत्या केली आहे. कॅनॉलमध्ये उडी मारून या रिक्षाचालकानं आपलं...
मुंबई ः वेबटीम
करोनाचा संसर्ग होईल या भीतीनं पुण्यातील एका रिक्षाचालकानं आत्महत्या केली आहे. कॅनॉलमध्ये उडी मारून या रिक्षाचालकानं आपलं जीवन संपवलं. अनिल खाटपे असं या रिक्षाचालकानं नाव आहे. तर सिन्नरमध्ये एका वृद्धानं गळफास घेऊन आत्महत्या केली.
राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. मुंबई, पुण्यासह राज्यभरात लाखो रुग्णांना करोनाचा संसर्ग झाला आहे. तर हजारोंचा मृत्यू झाला आहे. त्यामुळं अनेकांनी करोना विषाणूचा धसका घेतला आहे. पुण्यातही करोना विषाणूचा संसर्ग होण्याच्या भीतीनं अनिल खाटपे (वय ५४, बडदे चाळ, गारमाळ, धायरी) या रिक्षाचालकानं कॅनॉलमध्ये उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. दुसरीकडे, सिन्नरमधील भोकणी येथील एका वृद्धाने करोना संसर्गाच्या भीतीतून जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोलीत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
याआधीही करोनाच्या धास्तीने सिन्नर तालुक्यातील खोपडी शिवारात एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. एप्रिल महिन्यात ही घटना घडली होती. लक्ष्मण बर्डे असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव होतं. तो सिन्नर तालुक्यातील शहापूर येथील रहिवासी होता. करोनाचा संसर्ग झाल्याच्या भीतीनं त्यानं खोपडी शिवारातील एका शेतात असलेल्या झाडाला गळफास घेऊन जीवन संपवलं होतं. या प्रकरणी सिन्नर एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यानं आत्महत्येपूर्वी त्याने चिठ्ठी लिहिली होती. करोना होऊ नये म्हणून खूप खबरदारी घेतली होती. पण यश आले नाही. त्यामुळे मी देवाकडे जात आहे, अशा आशयाचा मजकूर त्याने चिठ्ठीत लिहून ठेवला होता.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत