मुंबई ः वेबटीम 'दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपद न मिळणं हे माझ्यासाठी अविश्वसनीय होतं. त्याचं दु:ख निश्चितच झालं होतं. आमचं सरकार येत नाह...
मुंबई ः वेबटीम
'दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपद न मिळणं हे माझ्यासाठी अविश्वसनीय होतं. त्याचं दु:ख निश्चितच झालं होतं. आमचं सरकार येत नाही हे समजल्यावर विश्वास बसायलाच दोन दिवस लागले. असं होऊ कसं शकतं, हेच समजत होतं. सर्वात जास्त आमदार भाजपचे निवडून आले होते. युतीचं बहुमत होतं. सगळं काही ठीक दिसत होतं. त्यानंतर दहा-पंधरा दिवसात मी नॉर्मल झालो. परिस्थिती स्वीकारली. त्यानंतर जी भूमिका मिळाली, ती घेऊन कामाला लागलो,' असं फडणवीस म्हणाले
राजकीय विश्लेषक व निवेदक राजू परुळेकर यांनी घेतलेल्या 'द इनसायडर' या ऑनलाइन मुलाखतीत फडणवीस बोलत होते. अपेक्षित नसताना मुख्यमंत्री होणं आणि अनपेक्षितपणे मुख्यमंत्रिपद जाणं हा अनुभव कसा होता या प्रश्नावर फडणवीस यांनी मनमोकळे उत्तर दिले. ते म्हणाले, 'मानसिकदृष्ट्या मी काही योग्याच्या पातळीवर पोहोचलेलो नाही. मी माणूसच आहे. त्यामुळं साहजिकच या घटना-घडामोडींचा आनंद व दु:ख हे मला झालं. 'मागच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेसाठी जे काही करता येईल ते मी केलं. शिवसेनेच्या विरोधातील भाजपच्या बंडखोरांचे अर्ज मागे घेण्यासाठी मी पाच तास बसलो होतो. शिवसेनेच्या तुलनेत भाजपचे बंडखोर कमी होते. शिवसेनेच्या अनेक उमेदवारांच्या प्रचाराला गेलो होतो. त्यांना मदत करत होतो. शिवाय, उद्धव ठाकरे यांनी एखादी गोष्ट सांगितली आणि मी ऐकली नाही असं पाच वर्षांत कधीच झालं नाही. त्यामुळं नंतरच्या सगळ्या घडामोडींचा मला सात्विक संताप आला,' असं ते म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत