कर्ज काढून देतो म्हणत दोघांकडून महिलेचा विनयभंग - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कर्ज काढून देतो म्हणत दोघांकडून महिलेचा विनयभंग

श्रीरामपुर  श्रीरामपूर परिसरातील मावलयाचा मळा गोंधवणी परिसर भैरवनाथ शिवार या भागात राहणारी एक ३८ वर्षाची विवाहित महिला हिला दोघा जणांनी ...

श्रीरामपुर 
श्रीरामपूर परिसरातील मावलयाचा मळा गोंधवणी परिसर भैरवनाथ शिवार या भागात राहणारी एक ३८ वर्षाची विवाहित महिला हिला दोघा जणांनी आपल्याला बँकेचे कर्ज प्रकरण करण्यासाठी बाहेरगावी जायचे आहे , असे फूस लावून आरोपी नं . फरराडे याच्या पांढरे रंगाचे चार चाकी गाडीमध्ये बसून खंडाळा गावचे शिवारात निर्जनस्थळी गाडी थांबवून आरोपी नं . १ याने पिडीत महिलेच्या शेजारील मागील बसून तिची साडी सिटवर काढण्याचा प्रयत्नकेला . तेव्हा महिलेने प्रतिकार करताच आरोपी २ याने तिला मारहाण केली व म्हणाला की , ते जे सांगतात तेच महिलेने श्रीरामपूर शहर पोलिसात कर त्यावेळी आरोपी १ याने महिलेला धरुन लज्जा उत्पन्नहोईल असे वर्तन करुन विनयभंग केला . घरी आल्यानंतर तू सदरचा प्रकार कोणास सांगितला तर तुला तसेच तुझ्या पोरांना जिवंत जाळून टाकील , अशी धमकी दिली . काल १०.३० च्यासुमारास खंडाळा गावच्या शिवारात हा प्रकार घडला . पिडीत विवाहित फिर्याद दिल्यावरुन आरोपी श्रीराम यशवंत फरगडे  , दत्तात्रय लक्ष्मण करंडे   सध्या सं . निसर्ग हॉटेलच्या पाठीमागे , भैरवनाथनगर , श्रीरामपूर या दोघांविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलिसात भादवि कलम ३६५ , ३५४ , ३५४ ( ड ) ५०६ , ३४ प्रमाणे गुरनं . १०६६ दाखल करण्यात आला . घटनास्थळी पोनि श्रीहरि बहिरट यांनी भेट दिली . आरोपी श्रीराम यशवंत फरगड़े , दत्तात्रय लक्ष्मण करंडे या दोघांना शहर पोलिसांनी अटक केली असून पोनि बहिरट यांच्या मार्गदर्शनाखाली हेकॉ हापसे हे पुढील तपास करीत आहेत . अशी माहिती शहर पोलीस सुत्रांनी दिली . या घटनेने गोंधवणी , भैरवनाथनगरसह श्रीरामपूर शहरात खळबळ उडाली आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत