मोदींनी आपल्या लष्कराशी विश्‍वासघात केला ः राहुल गांधी गरजले - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

मोदींनी आपल्या लष्कराशी विश्‍वासघात केला ः राहुल गांधी गरजले

दिल्ली ः वेबटीम  चीनने मोठ्या धाडसाने आमच्या जमीनीवर कब्जा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनच्या या कारवाईचा स्वीकार करत आमची भ...

दिल्ली ः वेबटीम 
चीनने मोठ्या धाडसाने आमच्या जमीनीवर कब्जा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनच्या या कारवाईचा स्वीकार करत आमची भूमिका नष्ट करून टाकली चीनच्या ताब्यात भारताची कोणतीही भूमी नाही असे म्हणून त्यांनी आमच्या लष्कराशी विश्वासघात केला, असे राहुल गांधी म्हणाले.
 चीनच्या या धाडसाचे आणि कारवाईचे एक कारण आमचे परराष्ट्र धोरण आहे, असे राहुल गांधी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुत्सद्देगिरिचा स्थापित संस्थात्मक पायाच ध्वस्त केला आहे, असे म्हणत भारताला आणि अमेरिका आणि अन्य देशांसोबत चांगले संबंध निर्माण करण्याची आवश्यकता आहे, असे राहुल म्हणाले. या बरोबरच आमचे जे मित्र राष्ट्र आहेत,अशांशीही आमची मैत्री कायम राखली पाहिजे, असेही ते पुढे म्हणाले.
   आमच्या भूमीचा ताबा घेऊन निघून जाण्याची चीनला कदापि अनुमती देता येणार नाही, असे राहुल गांधी म्हणाले. म्हणूनच जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये यासाठी जे-जे आवश्यक आहे ते-ते करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

पंतप्रधानांनी केले होते वक्तव्य

आमच्या जमिनीत ना कोणी घुसले आहे, ना कोणी आमची चौकी ताब्यात घेतली आहे, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत-चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत केले होते. त्यानंतर पंतप्रधानांच्या या वक्तव्यावर विरोधी पक्षांनी टीकास्त्र सोडले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत