सावधान ; हा नियम मोडला तर नवरदेव, नवरीसह वर्‍हाड्यांनाही जेलवारी ! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

सावधान ; हा नियम मोडला तर नवरदेव, नवरीसह वर्‍हाड्यांनाही जेलवारी !

राहुरी : वेबटीम    राहुरी  तालुक्यात कोरोनाचे रुग्ण दररोज सापडत आहेत.  त्यामुळे तहसीलदारांनी आता येथे कठोर नियम लावले आहेत. यापुढे लग्न...

राहुरी : वेबटीम 
 राहुरी  तालुक्यात कोरोनाचे रुग्ण दररोज सापडत आहेत.  त्यामुळे तहसीलदारांनी आता येथे कठोर नियम लावले आहेत. यापुढे लग्नात 50 पेक्षा अधिक वर्‍हाडी आढळले,  तर त त्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. बाहेरील जिल्ह्यातून लग्नाला येणार्‍या लोकांना कॉरन्टाईन व्हावे लागणार आहे.
 जिल्ह्यात अनेक भागात लग्न सोहळे डोकेदुखी ठरले आहेत. त्यातून अनेक कुटूंबाांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे याबाबींवर लक्ष केंद्रीत करून तहसीलदार फसियोद्दीन शेख यांनी लग्न समारंभासाठी परवानगी आवश्यक केली आहे. तसेच  लग्नातला येणार्‍यांच्या नावाची, गावाची यादी प्रशासनाला सादर करावी लागणार आहे. तसेच प्रत्येक लग्नाच्या ठिकाणी उपस्थितांचे तापमान मोजणी व ऑक्सीजन मापण होईल. 50 पेक्षा अधिक व्यक्ती उपस्थित असल्यास फौजदारी गुन्हा नोंदविला जाणार आहे.  तसेच लग्नात 50 पेक्षा अधिक व्यक्ती येणार  नाही याचे हमीपत्रही  दक्षता समितीला तर पालिका हद्दीत असल्यास नगरपरिषदेला द्यावे लागणार आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत