अखेर, पतीचा मृतदेह हातगाडीवर नेला स्मशानभुमित ; कोरोनाने माणुसकीला काळीमा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

अखेर, पतीचा मृतदेह हातगाडीवर नेला स्मशानभुमित ; कोरोनाने माणुसकीला काळीमा

मुंबई ः वेबटीम  कोरोनाने आज सर्वत्र वेगवेगळे चित्र पहायला मिळत आहे, कुणीही कुणाचे राहिले नाही, नाते-नात्यात राहिले नाही की कुणी जवळ य...

मुंबई ः वेबटीम 
कोरोनाने आज सर्वत्र वेगवेगळे चित्र पहायला मिळत आहे, कुणीही कुणाचे राहिले नाही, नाते-नात्यात राहिले नाही की कुणी जवळ येण्यास तयार नाही. जणूकाही माणुसकी हरवली आहे. अशाप्रकारे पतीचा मृत्यू झाल्याने कुणीही नातेवाईक कोरोनाच्या भितीने जवळ आले नाही, चार खांदेकरीही पुढे धावले नाही, अशावेळी या पत्नीने आपल्या पतीला हातगाडीवरून अमरधामात नेले व तेथेही कुणी मदतीला नसल्याने एकटीनेच अंत्यसंस्कार केल्याची हदयद्रावक घटना नुकतीच घडली. 
कोरोनाकाळात माणसाचं वेगवेगळं रुप समोर येत आहे. एकीकडे कोव्हिड योद्धे जीवाची पर्वा न करता, रुग्णांची सेवा करत आहेत, तर दुसरीकडे अंत्यसंस्कारालाही मदत न करणारी पाषाण हृदयी माणसं दिसत आहेत.
अंत्यसंस्कारासाठी चार खांदेकरी लागतात, पण चार लोक देखील कोरोनाच्या दहशतीमुळे येईना झालेत. अथणी येथील सदाशिव हिरट्टी (55) यांचा गुरुवारी रात्री मृत्यू झाला. सदाशिव यांच्या मृत्यूची माहिती शेजारी, नातेवाईक यांना समजली. शेजारी, नातेवाईक आले पण कोरोनामुळे मृत्यू झाला असेल म्हणून सगळ्यांनी लांब राहूनच अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर लगेचच ते निघूनही गेले. मात्र या मृतदेहावर अंत्यसंस्कार कोण आणि कसं करणार हा प्रश्न होता. शेवटी कोणीही मदतील नसल्याचं पाहून, सदाशिव यांच्या पत्नीने, पतीचा मृतदेह उचलून तो हातगाडीवर ठेवला. कपड्यात गुंडाळलेला मृतदेह हातगाडीवरुन ढकलत स्मशानभूमीत नेला. तिथेही कोणी तिच्या मदतीला नव्हतं. लोक बघत राहिले, पण एका व्यक्तीशिवाय कोणीही मदतीला आले नाही. सदाशिव यांच्या पत्नीने एकटीने पतीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत