जिल्ह्यात गायींची सर्रास कत्तले ; 73 जनावरांची सुटका, सात जणांवर गुन्हे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

जिल्ह्यात गायींची सर्रास कत्तले ; 73 जनावरांची सुटका, सात जणांवर गुन्हे

अहमदनगर ः वेबटीम     देशात गोवंश जनावरांची हत्या बंदी असतानाही सर्रासपणे जनावरांची कत्तले सुरू असल्याचे अनेकदा दिसून आले. काल नगर ये...

अहमदनगर ः वेबटीम    



देशात गोवंश जनावरांची हत्या बंदी असतानाही सर्रासपणे जनावरांची कत्तले सुरू असल्याचे अनेकदा दिसून आले. काल नगर येथेही कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या 73 जर्शी, गावरान गायी पोलिसांनी सुखरुप सोडविल्या. दरम्यान, याप्रकरणी सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक केल्याची माहिती समजली आहे. 

 झेंडीगेट परिसरात जनावरे कत्तल करण्यासाठी डांबून ठेवण्यात आली आहेत व काही जनावरांची कत्तल करुन मांसविक्री करण्यात येत आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर आज पहाटे पावणे तीनच्या सुमारास बाबा बंगाली येथील बंदीस्त पत्र्याचे शेड, झेंडीगेट परिसरात उभा असलेला टेम्पो आणि एका खोलीत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकानं छापा टाकला. तेथून अंदाजे १२ लाख ८६ हजार रुपये किंमतीचे एकूण ७३ गोवंशी जातीचे गावरान, जर्शी गोवंशीय गायी कालवड, वासरे व ५०० किलो मांस, एक वाहन, कुऱ्हाड, चाकू, सत्तुर असा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच या प्रकरणी अमन बाबु शेख ( रा.केडगांव, नगर), अदली इक्बाल कुरेशी ( रा.बाबा बंगाली , झेंडीगेट), रिजवान मुस्ताक शेख (रा. झेंडीगेट), सलिम अकबर चौधरी (रा.तपकीर गल्ली, नगर), नजिर अहमद शब्बीर कुरेशी (रा. झेंडीगेट), बबलू इस्माइल कुरेशी (रा.बेपारी मोहल्ला , नगर) , फिरोज शमशेर शेख (रा.बेपारी मोहल्ला, नगर ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अपर पोलीस अधीक्षक सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही. ए. पवार यांच्यासह सतीश शिरसाठ, कोतवाली पोलीस ठाणे व दंगल नियंत्रण पथकानं केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत