राहुरी ः वेबटीम राहुरी तालुक्यात कोरोनाने शिरकाव केल्यानंतर आज दिवसभरात एकही नवा रुग्ण न सापडल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र प्...
राहुरी ः वेबटीम
राहुरीचे अजून 42 अहवाल प्रतीक्षेत आहे. हे अहवाल काय येतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, कोरोना हा आजार गंभीर नाही, मात्र काळजी करण्याजोगा आहे. अनेक लोकांनी या आजाराचा मोठा धसका घेतला आहे. वास्तविकतः प्रचंड आत्मविश्वासाने व खंबीरपणे न खचता कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांनी यास सामोरे जाण्याची गरज आहे. तसेच इतरांनीही स्वतःची व आपल्या कुटूंबाची व समाजाची काळजी घेण्यासाठी मास्क, सेनिटायजर वापरणे गरजेचे आहे.
राहुरी तालुक्यात कोरोनाने शिरकाव केल्यानंतर आज दिवसभरात एकही नवा रुग्ण न सापडल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र प्रशासनाने काल 31 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले असून आज पुन्हा नवीन 11 जणांचे स्वॅब कोरोना चाचणी करण्यासाठी पाठविण्यात आल्याने आता या अहवालांकडे लक्ष लागले आहे.या अहवालात काही अधिकारी व कर्मचार्यांचेही स्वॅब असल्याने याकडेही सर्वांचे लक्ष लागलेले आहे.जिल्ह्यात कोरोनाचे धुमाकूळ घातलेला असताना राहुरी तालुक्यात 38 रुग्णांपैकी 17 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केलेली आहे. वांबोरी येथे एक रुग्ण सापडल्यानंतर राहुरी महसूल कार्यालयात कार्यरत असलेल्या एका महिला कर्मचार्याला कोरोनाची लागण झाल्याचा संशय आहे. त्यामुळे त्यांचाही स्वॅब घेण्यात आला आहे.
राहुरीचे अजून 42 अहवाल प्रतीक्षेत आहे. हे अहवाल काय येतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, कोरोना हा आजार गंभीर नाही, मात्र काळजी करण्याजोगा आहे. अनेक लोकांनी या आजाराचा मोठा धसका घेतला आहे. वास्तविकतः प्रचंड आत्मविश्वासाने व खंबीरपणे न खचता कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णांनी यास सामोरे जाण्याची गरज आहे. तसेच इतरांनीही स्वतःची व आपल्या कुटूंबाची व समाजाची काळजी घेण्यासाठी मास्क, सेनिटायजर वापरणे गरजेचे आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत