राहुरी : वेबटीम जिल्ह्यात कोरोना हातपाय पसरवत असताना त्यातून राहुरी तालुका अजूनही काही प्रमाणात सुरक्षीत आहे, मात्र रात्री श्रीरामप...
राहुरी : वेबटीम
जिल्ह्यात कोरोना हातपाय पसरवत असताना त्यातून राहुरी तालुका अजूनही काही प्रमाणात सुरक्षीत आहे, मात्र रात्री श्रीरामपुर 20 तर सोनई 6 पॉजिटिव आल्याने राहुरीच्या सर्व चहू बाजूंनी कोरोनाने दाट वेढ़ा घातला आहे, त्यामुळे आता खरी स्वताः प्रत्येकानी आप आपली काळजी घेण्याची गरज आहे, राहुरिकरांनो स्वताला,कुटुंबाला,तालुक्याला सांभाळ, अशी भावनिक साद तहसीलदार फसूद्दीन शेख यांनी जनतेला घातली आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालय येथील कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज रात्री उशिरा आणखी 33 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले. सुरूवातीला 49 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. आज दिवसभरात 82 जणांना कोरोना संसर्गाचे निदान झाले.
रात्री उशिरा प्राप्त झालेल्या 33 अहवालांमध्ये श्रीरामपूरमधील 21, नेवासेमधील 6, अकोले येथील 2, संगमनेरमधील तीन आणि शेवगावमधील एका रुग्णाचा समावेश आहे. दरम्यान संगमनेरमधील पाच जणांची कोरोना चाचणी पुन्हा करण्यात आली. ती पॉझिटिव्ह आली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत