अरे, इथं एक भेटेना, याने तर एकाच मंडपात केलं दोघींशी लग्न - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

अरे, इथं एक भेटेना, याने तर एकाच मंडपात केलं दोघींशी लग्न

दिल्ली : वेबटीम   एका तरुणाने एकाच मंडपात दोन तरुणींसोबत लग्नाचे फेरे घेतले. या लग्नाची जोरदार चर्चा आहे. या लग्नाचे फोटोही व्हायरल झाले...

दिल्ली : वेबटीम 
 एका तरुणाने एकाच मंडपात दोन तरुणींसोबत लग्नाचे फेरे घेतले. या लग्नाची जोरदार चर्चा आहे. या लग्नाचे फोटोही व्हायरल झाले आहेत. मध्य प्रदेशातील बेतुल जिल्ह्यात हे अगळेवेगळे लग्न झाले.
 
बेतुल जिल्ह्यातील घोडाडोंगरी भागातील केरिया गावात २९ जूनला हे लग्न झाले. तरुणाचे एका मुलीवर प्रेम होते. दुसरी मुलगी ही घरच्यांच्या पसंतीची होती. यामुळे त्याने दोघींशी एका मंडपात लग्नाचे फेरे घेतले.
भोपाळमध्ये तरुणीच्या प्रेमात
केरिया गावातील राहणारा संदीप ज्या दोन मुलींशी लग्न केलं त्यातील एक होशंगाबाद जिल्ह्यातील आहे. तर दुसरी मुलगी ही घोडाडोंगरी भागातील कोयलारी गावातील राहणारी आहे. भोपाळमध्ये शिक्षण घेत असताना संदीप होशंगाबादमधील तरुणीच्या प्रेमात पडला.
दरम्यान, संदीप हा गर्लफ्रेंडबरोबर लग्न करण्यास ठाम होता. तर कुटुंबीयांनी त्यांच्या पसंतीच्या मुलीशी संदीपने लग्न करावे, असा आग्रह धरला होता. यामुळे हे प्रकरण वाढत गेलं. अखेर या पंचायत बोलावण्यात आली. दोन्ही मुली संदीपसोबत राहण्यास तयार असतील तर त्यांचं त्याच्याशी लग्न करून टाकावं, असा निर्णय पंचायतीत झाला. या निर्णयावर दोन्ही मुलींनी होकार दिला.
लग्न हे केरिया गावात झालं. यात नवरदेवासह दोन्ही नवरींचे कुटुंबीय आणि गावातील नागरिक सहभागी झाले होते. तिघांच्या कुटुबींयांना या लग्नावर कुठलाही आक्षेप नव्हता. त्यांनी स्वतः पुढे जाण्याचा निर्णय घेतला, असं पंचायतीचे उपाध्यक्ष आणि लग्नाचे साक्षीदार असलेले मिश्रीलाल परते यांनी सांगितलं.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत