आज रविवार दि 12 जुलै, वाचा आजचे राशिभविष्य - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

आज रविवार दि 12 जुलै, वाचा आजचे राशिभविष्य

      मेष : करिअरच्या दृष्टीने निर्णय घेण्यास दिवस चांगला. कामकाजाच्या ठिकाणी वरिष्ठांची वाहवा मिळवाल. आर्थिक लाभ होईल. भाग्याची साथ लाभ...

     
मेष : करिअरच्या दृष्टीने निर्णय घेण्यास दिवस चांगला. कामकाजाच्या ठिकाणी वरिष्ठांची वाहवा मिळवाल. आर्थिक लाभ होईल. भाग्याची साथ लाभेल. कामानिमित्त प्रवास करावा लागेल. समस्यांचे निराकरण होईल. आत्मविश्वास कायम ठेवा.
वृषभ : व्यवसायातील भागीदाराचा सल्ला महत्त्वाचा असेल. धनाचा अपव्यय करू नका. उत्साह वाढविणाऱ्या घटना घडतील. जीवनस्तर उंचावेल. कुटुंबातील सदस्यांच्या सहयोगामुळे यशाचे मार्ग प्रशस्त होतील. दाम्पत्य जीवनात मधुरता येईल. दिवसाचा उत्तरार्ध उत्तम जाईल.
मिथुन : सल्लागार बनावे लागेल. धावपळ आणि दगदग वाढविणारा दिवस. जोडीदाराला तुमच्याप्रती आदर वाटेल. मिळणाऱ्या संधीचे सोने करा. हितशत्रू निष्प्रभ ठरतील. अनावश्यक खर्च टाळावेत. कामावर लक्ष केंद्रीत करा
कर्क : आप्तेष्टांमुळे व्यवसायात भरघोस नफा होईल. इच्छित ध्येय गाठू शकाल. उत्तरार्धात आवडते पुस्तक वाचाल. भावंडांची चिंता सतावेल. सल्लागार बनावे लागेल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना लाभ मिळेल.
सिंह : पारंपरिक दागिन्यांची खरेदी कराल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. सकारात्मकतेने वावराल. व्यापार, व्यवसायाची चिंता सतावेल. अस्थिरता गडद होण्याची शक्यता. आळसाचा त्याग करून कार्यरत राहावे.
कन्या : खूप दिवसांनी जुन्या मित्राची भेट होईल. मानसिक आनंद लाभेल. कलेच्या क्षेत्रातील व्यक्तींना यश प्रदान करणारा दिवस. धावपळ लाभदायक ठरेल. उत्साहाने कार्यरत राहाल. मास्क घातल्याशिवाय घराबाहेर पडू नका. पाणी उकळवून प्यावे.

तुळ : रागीट स्वभावावर अंकुश ठेवा. व्यवसायानिमित्त अचानक प्रवास करावा लागेल. प्रिय व्यक्तीकडून अपेक्षित होकार मिळेल. विनाकारण मन विचलित होईल. सामाजिक आणि व्यवसायिक क्षेत्रातील व्यक्तींना विरोधाला सामोरे जावे लागेल. मानसिक दुर्बलता टाळा.

वृश्चिक : सारासार विचार करून योजना कार्यान्वित करा. आत्मविश्वासाने कामे कराल. वैवाहिक आयुष्यात आनंदाचे वातावरण राहील. अचानक शुभवार्ता मिळतील. तणावाचा स्वतःवर परिणाम होऊ देऊ नये. नवीन योजना यश देतील. जुने वाद संपुष्टात येतील. अधिकारी वर्ग समजुतीने घेईल
धनु : प्रिय व्यक्तीच्या मनातील गैरसमज दूर करण्यात यशस्वी व्हाल. दिवस १०० टक्के अनुकूल राहील. रखडलेली कामे मार्गी लागतील. नवीन ओळख लाभदायक ठरू शकेल. गुंतवणूक फायदा करून देईल. विद्यार्थ्यांच्या आर्थिक समस्या संपुष्टात येतील. आत्मविश्वास वाढीस लागेल. दिवसाचा उत्तरार्ध उत्तम जाईल.

मकर : उत्साही स्वभावामुळे लोकप्रियता लाभेल. कुटुंबीयांच्या पाठिंब्यामुळे अवघड कामात यश मिळेल. दडपणातून सुटका होईल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. भाग्य साथ देईल. शुभवार्ता मिळतील. सायंकाळ हास्यविनोदात जाईल.

कुंभ : अडचणीतून बाहेर येण्यासाठी मित्रांची मोलाची साथ मिळेल. विरोधक नामोहरम होतील. महिलावर्ग करमणुकीत रमेल. कार्यक्षेत्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून उत्तम सहकार्य लाभेल. आधात्मिक आवड वाढेल. यश, प्रगतीचे मार्ग प्रशस्त होतील.  
मीन : कटू बोलणे टाळा. प्रिय व्यक्तीचे मन दुखावू नका. एकतर्फी विचार करणे घातक ठरेल. उन्नतीचे मार्ग प्रशस्त होतील. आधात्मिक आवड वाढेल. वादाचे प्रकरण मिटेल. हितशत्रूंपासून सावध राहा. ऊधारीचे व्यवहार टाळा. स्पर्धेत यश मिळेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत