आज रविवार दि 5 जुलै ; वाचा काय म्हणतेय तुमची रास - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

आज रविवार दि 5 जुलै ; वाचा काय म्हणतेय तुमची रास

तुमची रास कोणती? कोणत्या राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस लाभदायक ठरेल? आजचा दिवस कसा जाईल? जाणून घ्या... - पं. डॉ. संदीप अवचट मेष : व्...

तुमची रास कोणती? कोणत्या राशीच्या व्यक्तींना आजचा
दिवस लाभदायक ठरेल? आजचा दिवस कसा जाईल? जाणून घ्या...

- पं. डॉ. संदीप अवचट

मेष : व्यक्त होताना शब्द जपून वापरा. डोळ्यावर पट्टी बांधून विश्वास ठेवणे नको. भूतकाळातील ताण संपतील. वरिष्ठ अधिकाऱ्यांची नाराजी त्रस्त करेल. मध्यम फलदायी दिवस. रागावर नियंत्रण ठेवावे. सामाजिक सन्मान लाभतील. दाम्पत्य जीवनातील मधुरता वाढेल.
वृषभ : केटरर्सना वादाचा काळ. वाढीव कामात लाभच. युक्तीने प्रश्न सोडवा. दिनक्रम व्यस्त राहील. सरकारी नोकरदार वर्गाला वरिष्ठांची नाराजी सहन करावी लागेल. नवीन योजनांवर लक्ष केंद्रीत कराल. जवळच्या व्यक्तीने केलेल्या मदतीमुळे फायदा होईल.
मिथुन : तांत्रिक क्षेत्रातील मंडळी सुखावतील. वेगवान घटनांचा दिवस. अडकलेली कामे होतील. दिवसाची सुरुवात उत्तम होईल. नोकरदार वर्गाच्या समस्यांचे निराकरण होईल. दिवसाचा उत्तरार्ध मौजमजेत आनंदात जाईल.

कर्क : गरज समजून काम हवे. घाईने निर्णय घेतल्यास तोटा. मेहनतीला घाबरणे नको. आत्ममग्न राहाल. टीकाकारांकडे दुर्लक्ष करावे. यशाचे मार्ग प्रशस्त होतील. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कौतुकास पात्र व्हाल. व्यापार, व्यवसाय, उद्योगात लाभाचे योग.
सिंह : चोख हिशेब ठेवा. चुकीच्या सवयी ताण वाढवणारच. व्यसनांच्या आहारी जाऊ नका. हितशत्रूंचा त्रास संभवतो. अनावश्यक चिंता मन विचलित करू शकतात. कामावर लक्ष केंद्रीत करावे. अनोळखी व्यक्तींशी कोणताच व्यवहार करू नका.
कन्या : भेदभाव नको. व्यवसायानिमित्त प्रवास घडतील. संततीविषयक प्रश्न सुटतील. हाती घेतलेल्या कामांमध्ये यश मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. रचनात्मक कार्ये कराल. रागावर नियंत्रण ठेवावे. समस्यांचे निराकरण होईल. राजकीय मदत मिळण्याची शक्यता. प्रिय व्यक्तीशी संवाद साधाल.

कन्या : स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळेल; वाचा, मासिक राशीभविष्य
तुळ : वेगळे स्टंट करणे नको. शुभचिंतकाकडून काम होईल. धावपळ होईल. वर्तमान स्थितीमुळे मन विचलित होईल. समस्यांचे निराकरण होत नसल्याने मन खिन्न होऊ शकते. दिवस आळसात जाईल.
वृश्चिक : मूर्खांकडे दुर्लक्ष करावे. तणाव कमी करावा. वैद्यकीय सल्ला घ्यावा. तज्ज्ञ मंडळींचे मार्गदर्शन घ्यावे. नकारात्मक विचार टाळावेत. दिवसाच्या उत्तरार्धात मुलांकडून आनंदवार्ता मिळण्याची शक्यता. दिवस उत्साहात जाईल.
धनु : कामाचा ताण हलका होईल. विनोदी माणसे भेटतील. बदलातूनच नवचैतन्य येईल. प्रलंबित येणी प्राप्त होण्याची शक्यता. नवीन संपर्क लाभदायक ठरतील. विद्यार्थ्यांसाठी उत्तम दिवस. ऑनलाइन शिक्षणात गोडी निर्माण होईल.

मकर : त्वचाविकार डोके वर काढतील. भावनिक अस्थिरतेवर मात कराल. कनिष्ठांना कौतुकाची संधी. पराक्रमात वाढ होऊल. हितशत्रू पराभूत होतील. दिवसाचा उत्तरार्ध खर्चिक ठरेल. समाधानी राहाल.

कुंभ : विनाकारण व्याधी वाढणे शक्य. वाहनांपासून सावध राहा. कलुषित वातावरण निवळेल. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. कुटुंबाकडून योग्य साथ मिळेल. जोडीदाराच्या मताला प्राधान्य द्यावे.
मीन : मित्रसंचय हवा. लांबलेले करार पार पडतील. मुद्दलावर ध्यान द्यायला हवे. मुलांचे प्रश्न मार्गी लागण्याचे योग. एखाद्या स्पर्धेत विजय मिळवाल. उत्तम संधीमुळे मन प्रसन्न राहील. मोसमी आजार त्रस्त करण्याची शक्यता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत