राहुरीत आज 3 रुग्ण, सोनगाव, उंबरे व राहुरी शहराचा समावेश - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरीत आज 3 रुग्ण, सोनगाव, उंबरे व राहुरी शहराचा समावेश

राहुरी : वेबटीम     राहुरी तालुक्यात आज 3 नवीन रुग्ण आढळले आहेत, यात सोनगाव, राहुरी शहर व उंबरे गावाचा समावेश आहे, उंबरे गावात कोरोना ...

राहुरी : वेबटीम

  •    राहुरी तालुक्यात आज 3 नवीन रुग्ण आढळले आहेत, यात सोनगाव, राहुरी शहर व उंबरे गावाचा समावेश आहे, उंबरे गावात कोरोना रुग्णांची संख्या आता 2 झाली आहे, जनतेने घाबरून न जाता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे व स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाचे अधिकारी  किरण खेसम्हाळसकर यांनी केले आहे.
          राहुरी तालुक्यात काल 8 रुग्ण सापडले होते, तर आज सकाळी 3 नेऊन रुग्ण आढळल्याने तालुक्यात एकूण 58 रुग्ण झाले आहेत, यातील 21 रुग्ण बरे झाले आहेत, दरम्यान, उंबरे गावातील एका तरूणाला कोरोनाची बाधा झाली होती, त्यांच्या संपर्कातील लोकांचे स्राव घेतले आहेत, त्यात आज पुन्हा एक रुग्ण आढळला आहे, त्यामुळे उंबरे गावात कोरोना रुग्णांची संख्या आता 2 झाली आहे.   दरम्यान, कोरोना हा आजार कुणालाही होऊ शकतो, त्यामुळे त्याला घाबरण्याचे कारण नाही, उलट त्यावर यशवीरित्या मात करण्याची गरज आहे.  

*राहुरी तालुका कोव्हीड आजअखेर स्थिती* *पॉजिटिव्ह आज दिवसभरात ३*
  •  *आजअखेर एकुण केसेस ५८*
    *केसापुर ४*
    *पाथरे १*
    *सोनगांव ४*
    *वांबोरी ४*
    *तांदुळवाडी २*
    *म्हैसगांव ३* 
    *वरवंडी ६*
    *राहुरी फॅक्टरी १०*
    *देवळाली(शेटेवाड़ी) १*
    *देवळाली २*
    *कात्रड ४*
    *वळण १*
    *राहुरी शहर ९*
    *तमनर आखाडा १*
    *गुहा १*
    *तांदुळनेर १*
    *बारागांव नांदुर १*
    *डिग्रस १*
    *उंबरे २*
    *वरीलपैकी  ५ व्यक्ती* *(तमनरआखाडा १ सोनगांव २ वळण १ तांदुळनेर असे ५ व्यक्ति  तालुका बाहेरच रहीवासी असुन त्यांना बाहेरच संसर्ग झालेला असुन ते बाहेरच आहे परंतु त्यांचा मुळपत्ता राहुरी तालुका असल्यामुळे नोंदणी राहुरी तालुक्यात झाली आहे)*
    *पैकी उपचार पुर्ण झालेले २१*
    *उपचार सुरू ३७ (७ खाजगी मध्ये* घेतात) 
    *राहुरी तालुका कॉरंनटाईन सदय स्थिती विद्यापीठ १०८ आहे* 
    *आज अखेर एकुण स्वॉब घेतलेले ३६१ पैकी निगेटिव्ह २६९  पॉजिटिव्ह २३  व ६९ अहवाल बाकी*
    *तालुका बाहेर नोंदणी झालेले*
    *आज दिवसभरात ०*  
    *आजअखेर एकुण  ५* 
    *वांबोरी २*
    *टाकळीमियॉ २*
    *राहुरी शहर १*

    *(अपडेटेड दि. २४/७/२०२० दुपारी २.०० वाजेपर्यंतची स्थिती)*
     *(किरण खेसम्हाळसकर)*
    *रिपोर्टींग अधिकारी (CCC)*
    *तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय राहुरी)*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत